दिल्लीकरांसाठी महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीची मेजवाणी

९ ते ११ जानेवारीदरम्यान ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत


नवी दिल्ली : दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची माहिती देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सवा’चे ९ ते ११ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते रात्री ९.३० या वेळेत आयोजन करण्यात आल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी दिली.


महाराष्ट्र सदनात डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सवा’ला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आता हिवाळी हंगामाची मेजवानी म्हणून ‘हुरडा पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे.


शहर आणि गाव यांना जोडणारा हा भावनिक पूल दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अधिक जवळ घेऊन जाणारा ठरणार आहे. या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि चवीचा आनंद घेण्याचे आवाहन निवासी आयुक्त आर. विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे.


संक्रांतीचा गोडवा आणि हुरड्याचा खमंग स्वाद


मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवात ‘तिळगूळ’ आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. सोलापूर, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यातील शेतांमध्ये ज्याप्रमाणे शेकोटीवर (आकटी) हुरडा भाजून आनंद साजरा केला जातो, तसाच अनुभव येथे दिला जाणार आहे. हुरड्यासोबतच खमंग लसूण चटणी, शेंगदाणा कूट, पिवळाधमक गूळ, साजूक तूप, ताक आणि चुलीवरचे वाफाळलेले पिठलं-भाकरी, भरीत भाकरी, बटाटावडा, भजी सोबतच ऊस, बोरं, ओला हरबरा अशा अस्सल गावरान पदार्थांची रेलचेल येथे असणार आहे. थंडी, शेकोटीची ऊब आणि संगीत मैफिलीत हुरड्याचा आस्वाद, असा दुग्धशर्करा योग या निमित्ताने जुळून येणार आहे. याबरोबरच संक्रात वाणासाठी महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने