मुंबई: भारतीय सिनेसृष्टीत हि-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांचा देशभक्तीपर इक्कीस हा शेवटचा चित्रपट आज नववर्षानिमित्त प्रदर्शित झालाय. या चित्रपटामुळे चाहत्यांना धर्मेंद्र यांना शेवटचे पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने सिनेगृहात पहिल्या शो पासून गर्दी झाली आहे. धर्मेंद्रप्रमाणेच या चित्रपटातील मुख्य आकर्षण म्हणजे अगस्त्य नंदा. अगस्त्य नंदा हा इक्कीस चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान झालेल्या लढाईतील बलिदानासाठी मरणोत्तर परमवीर चक्र सन्मानित भारतीय सैन्यातील तरुण लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारीत या चित्रपटात अगस्त्य नंदा अरुण हे मुख्य पात्र करत आहे. नेटफ्लिक्सवरील झोया अख्तरच्या द आर्चीज या बॉलीवूड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेला अगस्त्यचा इक्कीस हा दुसरा चित्रपट आहे. मात्र त्याच्या पहिल्या चित्रपटापेक्षा तो यावेळी जास्त चर्चेत आला. कारण त्याने धर्मेंद्र सोबत काम केले आहे.
ढाका: मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोन हिंदू तरुणांची जमावाने हत्या केल्याचे समोर आले होते. ...
यागोष्टीत विशेष म्हणजे धर्मेंद्र आणि अगस्त्यच्या आजोबांची सिनेसृष्टीत आणि वैयक्तिक आयुष्यात जय-वीरू ही प्रसिद्ध जोडी आहे. अर्थात अगस्त्य हा जय म्हणजेच बिग बींचा नातू आहे. अगस्त्य हा अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन हिचा मुलगा आहे. आपल्या आजोबांसोबत नाही पण आजोबांच्या खास मित्रासोबत त्याने चित्रपटात काम केले आहे. ते ही बाप-बेट्याच्या भुमिकेत. त्यामुळे एकंदर अगस्त्य, अमिताभ आणि संपूर्णच बच्चन कुटुंबासाठी हा चित्रपट खास आहे. याबाबत कौन बनेगा करोडपती या शोमध्ये बोलताना सुद्धा बिग बींना अश्रु अनावर झाले होते.