क्रुरपणे मारहाण अन् नंतर पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न! बांगलादेशात आणखी एका हिंदूवर हल्ला

ढाका: मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोन हिंदू तरुणांची जमावाने हत्या केल्याचे समोर आले होते. हिंदूवरील हल्ले थांबत नाहीत. आता पुन्हा एकदाएका हिंदू व्यक्तीवर हल्ला झाल्याचे समोर आले. शरीयतपूर परिसरात खोकन चंद्रा नावाच्या एका हिंदू व्यक्तीला जमावाने घेरले. त्याला आधी क्रूरपणे मारहाण करण्यात आली, नंतर चाकूने मारले आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र खोकन चंद्रा यांनी तात्काळ जवळच्या तलावात उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजता कानेश्वर युनियनमधील तिलोई परिसरात हा क्रूर हल्ला झाला. खोकन चंद्रा हे व्यापारी आहेत. दामुड्यातील केउरभंगा बाजारात त्यांची फार्मसी आहे. रात्रीच्या वेळी खोकन चंद्रा दुकान बंद करून घरी निघाले तेव्हा तिलोई परिसरात त्यांना काही गुन्हेगारांनी अडवले. या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि नंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. आगीतून जीव वाचवण्यासाठी खोकन चंद्रा यांनी जवळच्या तलावात उडी मारली. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या लोकांनी गंभीर अवस्थेतील खोकन यांना तात्काळ शरीयतपूर येथील रुग्णालयात दाखल केले.



या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. या हल्ल्यामागील हेतू आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशमध्ये हिंदूंसह अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार वाढला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये आणि जगभरातील अनेक मानवाधिकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


१८ डिसेंबर रोजी, मयमनसिंगच्या भालुका उपजिल्हा येथील त्याच्या कारखान्यात एका मुस्लिम सहकाऱ्याने खोट्या ईशनिंदेच्या आरोपावरून २५ वर्षीय हिंदू तरुण दिपू चंद्र दास याला जमावाने मारहाण करून निर्घृणपणे ठार मारले. जमावाने दास यांची हत्या केली आणि नंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवला आणि नंतर तो जाळून टाकला. यानंतर २४ डिसेंबर रोजी, बांगलादेशातील कालीमोहर युनियनमधील हुसेनडांगा भागात २९ वर्षीय अमृत मोंडल नावाच्या आणखी एका हिंदू तरुणाची जमावाने मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे.


Comments
Add Comment

Colombia Earthquake : कोलंबियाला भूकंपाचा भीषण धक्का! ७.४ रिश्टरचा शक्तिशाली भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

बोगोटा : कोलंबियाच्या पश्चिम भागाला सोमवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या

Russian cosmonaut : रशियन अंतराळवीरांकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या विशेष शुभेच्छा

नवी दिल्ली : भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील रशियन

Japan warn US : अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Iran-US tensions : जमिनीवरील हल्ल्यास प्रत्युत्तर देण्याचा इराणचा इशारा, ट्रम्प यांच्या माघारीच्या प्रयत्नांना खीळ  

इराण आणि अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. अमेरिकेचे लष्कर इराणी भूमीवर

Mumbai Terror Attack : २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल अजीजचा संशयास्पद मृत्यू; मशिदीच्या गेटवर अचानक कोसळला, विषप्रयोगाची शक्यता?

- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी

Russia-India Trade : भारतासाठी रशियाची मोठी योजना; हिंद महासागरापर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा विचार

मुंबई : भारत आणि रशियामधील व्यापार संबंध आणखी मजबूत करण्यासाठी रशिया नव्या पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.