मुंबईत महायुतीमधील बंडोबांना थंड करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती

अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले फोन


मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली असताना, महायुतीने बंडोबांना थंड करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. मुंबईतील सहा जिल्ह्यांत समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मतफुटी रोखणे, एकमेकांच्या (भाजप-शिवसेना) उमेदवारांच्या प्रभागात मतदान वाढवणे आणि महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. उद्या(२ जानेवारी) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने समन्वयकांपुढे जास्तीत जास्त बंडखोरी थोपवण्याचे आव्हान आहे.


भाजपकडून मुंबईतील सहा जिल्ह्यांत (प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रमुख समन्वयक आणि त्यांना सहाय्यक समन्वयक) या नेमणुका करण्यात आल्या आहेत. समन्वयकांचे मुख्य काम दोन्ही पक्षांतील बंडखोरांना शांत करणे, मतविभाजन टाळणे आणि महायुतीच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देणे आहे. ज्या प्रभागात भाजपचा उमेदवार आहे, तेथे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोट बांधून मतदानाची टक्केवारी वाढवणे, तसेच शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रभागात भाजपची मते वळवणे, यासाठी समन्वयक प्रयत्न करणार आहेत. याशिवाय मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून प्रचारात त्यांना सहभागी करून घेण्याचे कामही त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.




मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर
बंडखोरीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी भावनिक आवाहन केले. सरकार आपले आहे, महापालिकांमध्येही आपलीच सत्ता येणार आहे. आज न्याय मिळाला नाही, पण भविष्यात नक्कीच मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उमेदवारी डावललेल्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी, विविध महामंडळांवर पदे किंवा पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.




Comments
Add Comment

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

NEET Students Protest : नीट विद्यार्थी आंदोलनावर संसदेत चर्चेचे गृहमंत्री अमित शहा यांचे आव्हान

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर आणि नीट पेपर फुटीप्रकरणावरून संसदेत आक्रमक झालेल्या

PM Narendra Modi : शॉर्टकटचा मोह टाळा, मेहनत आणि संघर्षाचा मार्ग निवडा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जेन-झी पिढीला मोलाचा सल्ला

नवी दिल्ली : सोशल मीडिया, रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या या आधुनिक युगात तरुणांनी क्षणिक यशाच्या मागे न धावता

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे