BMC Election 2026 : भाजप-शिवसेना वरळीतून फुंकणार प्रचाराचे रणशिंग! ३ जानेवारीला भव्य सभा

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची तोफ धडाडणार


मुंबई : जागावाटप आणि बंडखोरांची मनधरणी करून झाल्यानंतर, महायुतीने आता प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. येत्या ३ जानेवारी रोजी वरळीतील एनएससीआय डोम (वरळी डोम) येथे महायुतीची पहिली भव्य जाहीर सभा होणार असून, या सभेने मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक प्रचाराला औपचारिक सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजता सुरू होणाऱ्या या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे, ही सभा उबाठा गटाच्या बालेकिल्ल्यात आयोजित करून महायुतीने थेट ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे.



राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, निकाल १६ जानेवारीला जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर महायुतीची ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सभेतून महायुतीची एकजूट आणि ताकद मुंबईकरांसमोर ठळकपणे मांडली जाणार आहे. जागावाटप, उमेदवार निवड आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, या सभेतून महायुतीकडून मुंबईच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट, प्रचाराची दिशा आणि शहरासाठीचे भविष्यकाळातील व्हिजन स्पष्ट केले जाण्याची शक्यता आहे.



१२ दिवसांत प्रचाराचा धडाका


भाजप आणि शिवसेनेसह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांची या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा संचार करणे आणि उमेदवारांना बळ देणे, हा या सभेचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या १२ दिवसांत मुंबईत विभागनिहाय सभा, रोड शो आणि प्रचार फेऱ्यांचा धडाका लावला जाणार असून, ३ जानेवारीची वरळी डोममधील ही सभा त्याची नांदी ठरेल. राजकीय वर्तुळाचे या सभेकडे विशेष लक्ष लागले आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या संयुक्त प्रचारसभा ५ जानेवारीपासून सुरू होणार असताना, दुसरीकडे महायुतीची ही पहिली सभा ठाकरेंच्याच प्रभावक्षेत्रात होत असल्याने निवडणुकीतील वातावरण अधिकच चुरशीचे होईल, असे बोलले जात आहे

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला