अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले फोन
मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली असताना, महायुतीने बंडोबांना थंड करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. मुंबईतील सहा जिल्ह्यांत समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मतफुटी रोखणे, एकमेकांच्या (भाजप-शिवसेना) उमेदवारांच्या प्रभागात मतदान वाढवणे आणि महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. उद्या(२ जानेवारी) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने समन्वयकांपुढे जास्तीत जास्त बंडखोरी थोपवण्याचे आव्हान आहे.
भाजपकडून मुंबईतील सहा जिल्ह्यांत (प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रमुख समन्वयक आणि त्यांना सहाय्यक समन्वयक) या नेमणुका करण्यात आल्या आहेत. समन्वयकांचे मुख्य काम दोन्ही पक्षांतील बंडखोरांना शांत करणे, मतविभाजन टाळणे आणि महायुतीच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देणे आहे. ज्या प्रभागात भाजपचा उमेदवार आहे, तेथे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोट बांधून मतदानाची टक्केवारी वाढवणे, तसेच शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रभागात भाजपची मते वळवणे, यासाठी समन्वयक प्रयत्न करणार आहेत. याशिवाय मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून प्रचारात त्यांना सहभागी करून घेण्याचे कामही त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीची तोफ धडाडणार मुंबई : जागावाटप आणि बंडखोरांची मनधरणी करून झाल्यानंतर, महायुतीने आता प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ...






