मोहित सोमण: वर्षाच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात शेअर बाजाराने वाढ नोंदवली आहे. सेन्सेक्स ५४५.५२ अंकांने उसळत ८५२२०.६० पातळीवर स्थिरावला असून निफ्टी १९०.७५ अंकांने उसळत २६१२९ पातळीवर स्थिरावला आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार ही पातळी राखण्यास बाजाराला यश आले असताना विशेष उल्लेख म्हणजे सुरूवातीच्या संथ तेजीनंतर बँक निर्देशांकाने अखेरीस अधिक उसळी घेतल्याने बाजारात अधिक रॅली झाली. सपोर्ट लेवल कायम राखताना आयटी वगळता इतर निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ दिवसभरात मेटल, मिडिया, पीएसयु बँक ळ कंज्यूमर ड्युरेबल्स, ऑटो शेअर्समध्ये झाल्याने बाजारातील सकारात्मकता अधोरेखित झाली आहे. २५ डिसेंबरनंतर व तत्पूर्वी बाजारात किरकोळ घसरण झाल्याने घरगुती रिटेल गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला होता. त्यामुळे गंभीर जागतिक अस्थिरतेत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपला निधी काढून घेतल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजारासह शेअर बाजारात मोठे नफा बुकिंग केले होते. आजही कच्च्या तेलाच्या निर्देशांकासह सोने चांदी मर्यादेत राहिल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक टिकवून घेतल्याची शक्यता असताना घरगुती गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील खरेदीत वाढ केली आहे. इयर ऐंड व्हॉल्यूम मध्ये वाढ झाल्याने बाजारात निर्देशांक उसळला गेला.
व्यापक निर्देशांकातील स्मॉलकॅप १००, मिडकॅप १००, निफ्टी ५००, स्मॉलकॅप ५० या निर्देशांकात मोठी वाढ झाली असून विशेषतः १% पेक्षा कमी पातळीवर सुरू असलेला अस्थिरता निर्देशांक अखेरच्या सत्रात २.०९% कोसळल्याने निश्चितच तांत्रिकदृष्ट्या बाजारात फायदा झाला आहे. त्यामुळे सलग चार सत्रातील घसरणीनंतर आज बाजारात तेजी नोंदवली गेल्याने बाजारात पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.
आशियाई बाजाराचा विचार केल्यास चीनच्या उत्पादन निर्देशांकात मोठी वाढ झाल्याचा अधिकचा फायदा बाजारात झाला. युएस बाजारातील वाढलेल्या १० वर्षाच्या यिल्डमध्ये किंचित वाढ झालेली असताना युएस बाजारातील व्यापक निर्देशांकातही वाढ झाल्याने व युएसकडून रशिया आणि युक्रेन यांच्यातील तोडगा निघू शकतो अशी वातावरणनिर्मिती झाल्याने शेअर बाजारातील उत्सुकता कायम राहिली आहे. वर्षाच्या अखेरीस युएससह आशियाई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी मोठा उत्साह नोंदवल्याचे बाजारात दिसून आले. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील संमिश्रित कल कायम असताना युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात मात्र तिन्ही बाजारात पुन्हा एकदा घसरण दिसत आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ग्राफाईट इंडिया (९.१९%), क्राफ्ट्समन ऑटो (७.४६%), एमआरपीएल (७.२४%), एचएफसीएल (६.७६%), एचपीसीएल (६.४६%), गुजरात गॅस (५.३०%) समभागात सर्वाधिक वाढ झाली असून सर्वाधिक घसरण वोडाफोन आयडिया (१०.७८%), नवीन फ्ल्युरोटेक (३.५३%), आदित्य एएमसी (२.८४%), हिन्दुस्तान कॉपर (२.८२%), रेडिको खैतान (२.३०%), हिन्दुस्तान झिंक (२.०६%), स्विगी (१.९८%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' बाजारांनी २०२५ वर्षाचा शेवट दमदारपणे केला, ज्यात सर्वच क्षेत्रांमध्ये व्यापक सुधारणा दिसून आली. पुढे पाहता, मागणीच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे, २०२६ मध्ये सकारात्मक तेजी येण्याची अपेक्षा वाढत आहे. गुंतवणूकदारांची भावना कॉर्पोरेट नफा आणि नाममात्र सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीतील संभाव्य वाढीवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. सरकारने पोलाद उत्पादनांवर आयात शुल्क जाहीर केल्यानंतर आज धातूंच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. दरम्यान, स्थिर मागणीच्या अपेक्षेने आणि मजबूत रिफायनिंग मार्जिनमुळे तेल आणि वायू क्षेत्राने उत्कृष्ट कामगिरी केली.'