माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती


मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे. आवश्यकता भासल्यास या कालावधीत वाढ अथवा कपात करण्याचे सर्व अधिकार राज्य शासनाकडे आहेत.


भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) १९९० च्या बॅचचे अधिकारी असलेले सदानंद दाते शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून ते सूत्रं स्वीकारतील. गृह मंत्रालयाने बुधवार ३१ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.


मार्च २०२४ पर्यंत सदानंद दाते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख होते, त्यानंतर ते भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) नेतृत्व करण्यासाठी नवी दिल्लीला गेले. राज्य सरकारच्या विनंतीवरून त्यांना दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले.




कोण आहेत सदानंद वसंत दाते ?


कसाबसह दहा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत हल्ला केला होता. यापैकी दोन दहशतवाद्यांशी दक्षिण मुंबईतील कामा रुग्णालयात थेट संघर्ष करणाऱ्या सदानंद दाते यांना राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. दातेंनीच पुढे जिवंत पकडलेल्या कसाब या दहशतवाद्याशी संबंधित प्रकरणाचा तपास केला होता.


सदानंद दाते यांनी महाराष्ट्र एटीएस प्रमुख, मुंबई सहपोलीस आयुक्त (गुन्हे), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), कायदा व न्या विभागाचे संयुक्त सचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या फोर्स वन या कमांडो पथकाचेही नेतृत्व केले आहे.


काही वर्षांपूर्वी बिहारच्या राहुल राजने मुंबईत प्रवाशांसह बेस्ट बसचे अपहरण केले होते. राज ठाकरेंना ठार मारायचे आहे त्यांच्या घरी बस घेऊन चला असे म्हणत या तरुणाने दहशत निर्माण केली होती. अखेर सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चतुराईने परिस्थिती हाताळत सदानंद दाते यांनी राहुल राजला चकमकीत ठार केले होते. दातेंनी २६/११ च्या वेळी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली होती. त्यावेळी चकमकीत जखमी झालेल्या दातेंना नंतर राष्ट्रपतींनी शौर्य पदकाने गौरविले होते.


दातेंनी हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठातून व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी उच्च शिक्षण घेतले होते. जर्मन फेडरल पोलिसांच्या विशेष युनिट GSG-9 (Grenzschutzgruppe-9) सोबतही त्यांचे विशेष प्रशिक्षण झाले आहे.


Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या