भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी


गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ११५ पैकी ८८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि भाजप संघटनेतील पदाधिकाऱ्यांना नगरसेवक बनण्याची संधी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उमेदवारी देताना भाजपने सर्वच समाजघटकांचा विचार केलेला आहे.


वसई-विरार महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) महायुती म्हणून लढत आहे. श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला सुद्धा महायुतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. महापालिकेच्या ११५ जागांपैकी ८८ जागा भाजप लढवित असून, शिवसेना २७ जागांवर लढत आहे. श्रमजीवी आणि आगरी सेनेला भाजपच्या कोट्यातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, पालघर लोकसभा आणि जिल्ह्यातील पाच विधानसभा जिंकल्यानंतर आणखी संघटन मजबूत केलेल्या भाजपने नुकताच झालेल्या नगरपरिषद ,नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन नगराध्यक्षांसह ५० नगरसेवक निवडून आणले आहेत. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम भाजपने केले आहे. वसई विरार मध्ये सुद्धा पक्ष वाढीसाठी कार्य करणाऱ्या अनेक पदाधिकारी,कार्यकर्त्यांना भाजपने महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली आहे.


भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी विधानसभा प्रमुख मनोज पाटील, महामंत्री विश्वास सावंत, उपाध्यक्ष नारायण मांजरेकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके, प्रदेश सचिव अपर्णा पाटील, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष मॅथ्यू कोलासो, सरचिटणीस विजेंद्र सिंग,युवा मोर्चा आघाडी अध्यक्ष विनित तिवारी, वसई रोड मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर, वसई पूर्व वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नालासोपारा तुळींज मंडळ अध्यक्ष प्रमोद सिंग, विरार पश्चिम मंडळ अध्यक्ष विशाल राऊत, वसई ग्रामीण पश्चिम अध्यक्ष आशिष जोशी यांच्या पत्नी मनिषा जोशी यांच्यासह उत्तम कुमार, रवी पुरोहित, गौरव राऊत, जॉन बावटीस, युगा वर्तक, स्मिता लोपीस, मेहुल शहा, राजीव म्हात्रे, पिंकी कवर- राठोड, ॲड. दर्शना त्रिपाठी, दीपा चावडे, गणेश पाटील, कमलेश खटावकर, नीतू झा, सुचिता शेट्टी, श्रमजीवीचे महेश धांगडा आणि आगरी सेनेच्या विजय घरत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


१४ उत्तर भारतीय निवडणूक रिंगणात


महापालिका निवडणुकीच्या आनुषंगाने उत्तर भारतीय समाजामध्ये भाजप विरोधी वातावरण करण्याचा प्रयत्न काहींकडून केल जात होता. विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर भारतीय मतदारांचा उपयोग करून घेण्यात आला. असा संदेश पसरविणाऱ्यांना भाजपने चांगलीच चपराक दिली आहे.या निवडणुकीत भाजपने १४ उत्तर भारतीय नागरिकांना उमेदवारी दिली आहे.


Comments
Add Comment

Ranveer Singh : प्रसिद्ध कलाकार होण्यापूर्वी रणवीरसोबत घडला 'हा' घृणास्पद प्रकार

- रणवीरलाही सामोर जावं लागलं 'कास्टिंग काउच'ला मुंबई : बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांना या इंडस्ट्रीत काम

Bigg Boss Marathi 6 : बीग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची तारीख ठरली ?

मुंबई : बीग बॉस मराठी ६ सीजन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सीजनची जोरदार चर्चा रंगली असल्याचे पाहायला

सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी

मुंबई : ‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला

Sonalee Kulkarni Manjula song : मंजुळा गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी महाराष्ट्राची अप्सरा सज्ज

मुंबई : प्रेक्षकांच्या मनावर अप्सरा म्हणून राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता हटके आणि नव्या अंदाजात

उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी 'या' आरोग्यवर्धक पदार्थाचं सेवन करा, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्याचा तडाखा सध्या सर्वत्र जाणवत आहे. अनेकजण उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि घशाची कोरड घालवण्यासाठी

Cup Bashi Movie : लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सासू-सुनेची 'ही' कमाल जोडी, 'कप बशी' सिनेमाचं पोस्टर रिलीज

सासू आणि सुनेचं नातं म्हटलं की प्रेम, आदर राग तर कधी रुसुवे फुगवे अशा संमिश्र भावना येतात. लवकरच या नात्यातील एक