सुरु होणार भक्तीचं महापर्व; संत सखुबाई घेणार जलसमाधी

मुंबई : ‘सन मराठी’वरील ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक अत्यंत भावनिक आणि थरारक भाग पाहायला मिळणार आहे. सखु दिगूचे प्राण वाचवते, पण या घटनेचे श्रेय झिंग्रोबाला द्यावे म्हणून मनोरमा आणि नागोजी एक मोठे कारस्थान रचतात. सखुला अंधारात ठेवून झिंग्रोबाच्या पूजेची तयारी केली जाते, मात्र सत्य समजल्यावर सखु ठामपणे नकार देत सर्वांसमोर विठुरायावरचा तिचा अढळ विश्वास व्यक्त करते.


यामुळे संतापलेला नागोजी गावकऱ्यांमध्ये भीती पसरवतो आणि झिंग्रोबाचा कोप दाखवत सखुवर अमानुष अत्याचार करतो. तरीही सखु कोणत्याही परिस्थितीत विठोबाची भक्ती सोडायला तयार होत नाही. तिची ही न डगमगणारी श्रद्धा पाहूनही नागोजी थांबत नाही आणि अखेर सखुला तिच्या लाडक्या विठोबाच्या मूर्तीसह तळ्यात बुडवण्याचा निर्णय घेतो. या जलसमाधीच्या प्रसंगात सखु आपल्या विठुरायाला कवटाळत मृत्यूला सामोरी जाते.


आता विठुराया सखूला या प्रसंगातून कशाप्रकारे बाहेर काढेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. मालिकेत सुरु होणार भक्तीचं महापर्व, येत्या २९ मार्च रविवार दु. १:०० आणि सायं. ७:३० वाजता जलसमाधी विशेष भाग पाहायला मिळणार आहे.


संत सखुबाई यांची भूमिका साकारणारी बालकलाकार स्वराली खोमणे या प्रसंगाबद्दल म्हणाली की, "संत सखूबाईंची भूमिका साकारत असल्यापासून मला खूप सकारत्मकता जाणवते. नुकतंच मला दोरखंड लावून वर लटकवलं होतं. याचबरोबर जलसमाधीचा सीन शूट झाला. जेव्हा पण असे प्रसंग असतात तेव्हा मला भीती वाटते पण एकदा कॅमेरा रोल झाला की संत सखूबाईंसारखी हिम्मत माझ्यात येते.


या आठवड्यात संत सखूबाईची कठोर परीक्षा घेतली जाणार आहे त्यातही विठुराया त्यांना कशी मदत करेल हे पाहायला सगळेच उत्सुक आहेत. खरंतर मी हे पात्र साकारू शकते कारण माझे आई बाबा, मालिकेची टीम मला खूप सांभाळते, माझी काळजी घेते. आता माझ्या परीक्षा सुरु आहेत. अभ्यास सांभाळून मालिकेत मुख्य भूमिका साकारणं खूप कठीण आहे पण मालिकेच्या टीमचा पाठिंबा असल्यामुळे हे सगळं शक्य होतं."

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट