सरकारकडून ३.७४ लाख कोटींच्या ट्रेझरी बील विक्रीची घोषणा

मुंबई: सरकारच्या तात्पुरत्या निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार लघू काळासाठी ३.७४ लाख कोटींची निधी ट्रेझरी बील मार्फत उभारणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. चौथ्या तिमाहीत १२ आठवड्यापर्यंतच्या कालावधीसाठी हा निधी उभारला जाईल. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २९००० ते ३५००० कोटी दरम्यान रक्कमेची ही सिक्युरिटीज बील बाजारात उपलब्ध केले जातील असे सांगितले जात आहे. सध्याची अर्थव्यवस्था पाहता देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील गरजा, तत्कालीन परिस्थिती, अस्थिरता याआधारे रक्कमेची आकडेवारी, रक्कमेची मुदत व बिलाचा कालावधी यावर निर्णय घेण्याची स्वतंत्रता सरकारकडे असणार आहे. अर्थात आरबीआयचा (Reserve Bank of India RBI) सल्ला व बँकेच्या मार्गदर्शनाअंतर्गत केंद्र सरकार यावर अंतिम निर्णय घेईल. गेल्या वर्षीही या कालावधीत सरकारने याच कारणासाठी २.४७ लाख कोटीची उभारणी केली होती.


याविषयी निश्चित माहिती देताना,'रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सल्ल्याने, सरकारला बाजारातील गरजा, बदलत्या बाजाराची परिस्थिती आणि इतर संबंधित घटकांनुसार, बाजाराला योग्य सूचना दिल्यानंतर ट्रेझरी बिलांच्या लिलावासाठीची सूचित रक्कम आणि वेळेत बदल करण्याचे स्वातंत्र्य असेल असे निवेदनात म्हटले आहे.' असे वित्त मंत्रालयाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.


ट्रेझरी बील हे सरकार आपल्या गरजेनुसार विविध तिमाहीत बाजारात दाखल करते. सरकारच्या विकासनिधीसाठी व अर्थव्यवस्थेतील गतीमानता नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार या निधीची उभारणी करते. गेल्या वर्षीही सरकारने या माध्यमातून निधी उभारणी केली होती. तात्पुरता निधी देय (Debt Fund) उभे करून सरकार विविध दैनंदिन व्यवहारातील निधीच्या गरजा पूर्ण करत असते. अर्थातच ही मोठी रक्कम सरकारने उभी केल्याने खेळत्या बाजारातील निधी मोठ्या प्रमाणात शोषला जातो. त्यामुळे भांडवली बाजारात क्रेडिट उभारणीसाठी आणखी मागणी वाढते. परिणामी बँकेला अतिरिक्त निधी उभारणीसाठी व्याजदरात वाढ करावी लागू शकते व कर्ज महागण्याची शक्यता असते. याखेरीज भांडवली बाजारातील तरलता कमी झाल्याने बाजारात क्रेडिटचा पुरवठा नियंत्रित केला जातो. मागील आठवड्यात सरकारने ओएमओ (Open Market Operation) बाँड खरेदी केले होते. वित्तीय पतधोरण समितीच्या बैठकीत २ लाख कोटीचे बाँड खरेदी करण्याचे आरबीआयच्या निर्णयानंतर आता या नव्या बीलाची खरेदी आरबीआय मार्फत करेल अशी माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

वीस वर्षांची सवय ठरली घातक; रोजच्या कॉफीतून शरीरात साचलं विष, अखेर ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तैवान : तैवानमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आलं असून, रोजच्या वापरातील एका

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी