इंडोनेशियात भीषण दुर्घटना

जकार्ता : इंडोनेशियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग लागली असून यामध्ये १६ वृद्धांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतात मनाडो येथे ही घटना घडली आहे. मध्यरात्री रहिवासी झोपेत असताना आग लागली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून केवळ एकाच व्यक्तीचा मृतहेद जळण्यापासून वाचला आहे. तर या घटनेत जखमी झालेल्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. सध्या मृतांमध्ये कोणाचा समावेश होता याचा शोध घेतला जात आहे. यासाठी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.


रिटायरमेंट होमच्या शेजारच्या रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली होती. यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तिथे तातडीने पोहोचल्या. मात्र आग विझवण्यासाठी जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.


स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही आग लागण्यामागचे कारण अस्पष्ट असून याची चौकशी केली जात आहे. संपूर्ण परिसरात बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आगीच्या ज्वाळा दिसल्या, यासोबतच लोकांच्या किंचाळ्यांचे आवाज ऐकू आले. शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न देखील केले. पण आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलालाही विझवण्यात अडथळा येत होता.

Comments
Add Comment

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा

बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ हल्ले

एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला ढाका : बांगलादेशात हिंदू

बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचं निधन

ढाका: बांग्लादेशच्या पहिला महिला पंतप्रधान खालिदा जिया यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही

तळीरामांची मज्जाच मज्जा; अवघ्या १८ रुपयांत बिअर, जाणून घ्या कुठे मिळेल ?

व्हिएतनाम : नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी,

पाकिस्तानात माजी लष्करी अधिकारी आदिल राजा 'दहशतवादी' घोषित

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान इमरान खान यांचे समर्थक आणि माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांना

ऑपरेशन सिंदूरमुळे बंकरमध्ये लपण्याची वेळ!

पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांच्याकडून खुलासा इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या