वेगवान बहिरी ससाणा नांदूर मधमेश्वर अभयारण्यात!

ताशी २९० किमीचा वेग


नाशिक : हवेत अविश्वसनीय वेगाने झेपावणारा, पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान म्हणून ओळखला जाणारा ‘पेरेग्रीन फाल्कन’ अर्थात बहिरी ससाणा पक्ष्याचे नांदूर मधमेश्वर अभयारण्यात आगमन झाले आहे. निफाड तालुक्यातील हे अभयारण्य सध्या ३५ ते ४० हजार देशी-विदेशी पक्षांनी बहरलेले आहे. बहिरी ससाणा हा निसर्गातील एक अद्भुत शिकारी पक्षी आहे, जो आपल्या, वेगामुळे आणि शिकारीच्या कौशल्यामुळे ओळखला जातो. विलक्षण चपळता आणि उच्च गती क्षमता पेरेग्रीन फाल्कनला इतरांपेक्षा वेगळ्या करतात.


तापमानाचा पारा खाली घसरला असताना गोदावरी नदीवरील नांदूर मधमेश्वर बंधारा हजारो पक्ष्यांनी गजबजला आहे. यामध्ये परदेशी पक्षची संख्या मोठी आहे. अलास्कामधून सोनचिखल्या, सैबेरियामधून क्रौच करकोचा, उत्तर कोरियामधून थापट्या, पूर्व सैबेरियातून तरंग, युरेशियन विजन, उत्तर-युरोप आणि पूर्व सैबेरियातून चक्रांग बदक, थापट्या, तलवार बदक, हिमालयमधून नकटा, लडाखमधून चक्रवाक, कजाकिस्तान, तिबेटमधून पट्ट कादंब आणि उत्तर- युरोपमधून लालसरी पक्षी हजारो किलोमीटर अंतर पार करून अभयारण्यात आले आहेत. या घटनाक्रमात पेरेग्रीन फाल्कन अर्थात बहिरी ससाणाचे नुकतेच नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पर्यटक व पक्षिमित्र डॉ. श्रीराम उपाध्ये यांना दर्शन झाले. त्यांनी अतिशय सुंदर आणि मनमोहक छायाचित्र आपल्या कॅमेरात टिपले. वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी पेरेग्रीन फाल्कन सहसा दिसत नाही, नांदूरमध्येश्वर परिसरात त्याचे क्वचित आगमन होते असे नमूद केले. युरोप व अमेरिका क्षेत्रात हा पक्षी आढळतो. मोठा प्रवास करून तो भारतात आल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.


बहिरी ससाणा हा एक अत्यंत वेगवान आणि कुशल शिकारी पक्षी आहे, जो त्याच्या चपळाईसाठी आणि हवेत वेगाने झेप घेण्यासाठी ओळखला जातो. त्याला भारतीय उपखंडात ‘शाही ससाणा’ असेही म्हणतात, जो इतर लहान पक्ष्यांची आणि सरपटणारे प्राणी यांची शिकार करतो. अत्यंत वेगाने झेप घेऊन भक्ष्याच्या पाठीचा कणा चोचीने तोडतो. तो गडद हिरव्या पंखांचा, चपळ शरीरयष्टीचा आणि डोळ्याच्या बाजूला काळ्या पट्ट्या असलेला पक्षी असल्याचे वन विभागाकडून सांगितले जाते. पेरेग्रीन फाल्कन हा कदाचित पृथ्वीवरील सर्वात वेगवान पक्षी आहे. तो ताशी १८० मैलांपेक्षा (सुमारे ताशी २९० किलोमिटर) जास्त वेगाने मार्गक्रमण करतो. शिकारीकडे झेपावताना त्याचा वेग आणखी वाढतो, असे मानले जाते. हा एक अत्यंत वेगवान आणि कुशल शिकारी पक्षी आहे, जो त्याच्या चपळाईसाठी आणि हवेत वेगाने झेप घेण्यासाठी ओळखला जातो.

Comments
Add Comment

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये आज आणि उद्या वाहतूक निर्बंध

पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा

भंसालींचा ‘लव्ह अँड वॉर’२०२६ मध्ये प्रदर्शित होणार; २०२७ च्या अफवांना सूत्रांकडून फेटाळणी

भंसालींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या प्रदर्शनावर शिक्कामोर्तब: २०२६ मध्येच येणार, २०२७च्या अफवा खोट्या ठरल्या संजय

सिंजीन इंटरनॅशनलने ब्रिस्टल मायर्स स्क्विबसोबत संशोधन करार २०३५ पर्यंत वाढवला

मोहित सोमण: सिंजीन इंटरनॅशनलने ब्रिस्टल मायर्स स्क्विबसोबतचे दीर्घकालीन संशोधन सहकार्य २०२५ पर्यंत वाढवले आहे

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराचा मृत्यू

शिक्षा पूर्ण होऊनही कैदेत ठेवण्याचा अमानवी प्रकार पालघर : शिक्षेचा कालावधी संपून तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही

मुंबई महापालिकेत यंदाही महापौरांविना झेंडावंदन

महापौरांची निवड काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक संपन्न होवून मतदारांनी

प्रजासत्ताक दिनी मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ सेवेत येणार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर रखडलेले मेट्रो प्रकल्प पुन्हा मार्गी लागले असून, मंडाळे ते