आरे ते कफ परेड मेट्रो रात्रभर धावणार

बुधवारी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन


मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर


मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोची ‘ॲक्वालाईन’(मेट्रो-३) म्हणजेच आरे ते कफ परेड ही मेट्रो रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतणाऱ्या प्रवाशांना आता टॅक्सी किंवा रिक्षाच्या प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.


ही विशेष सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होईल ते १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५.५५ वाजेपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे. त्यानंतर, १ जानेवारीची नियमित मेट्रो सेवा सकाळी ५.५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. मुंबईकरांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा थेट १ जानेवारीच्या रात्रीपर्यंत सलग उपलब्ध मिळणार आहे.


नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. अशावेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांना विनासायास प्रवास करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोचा हा रात्रभराचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांचा झाला टाय टाय फिश; पाणी पट्टी वाढवल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न, आयुक्तांनी काढली हवा

मुंबई: मुंबई महापालिकेत विरोधी पक्षात बसलेल्या उबाठाच्या नगरसेवकांचा आपण सक्षम विरोधी पक्ष असल्याचे सिद्द

समुद्रात मासे कमी आणि कचराच जास्त; महापालिका सभागृहात कोळी समाजाच्या नगरसेवकांना मांडावी लागली व्यथा

मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता

मुंबईतील बांधकामे सिल करा, विकासकांना टाका काळ्या यादीत; मुंबई महापालिकेची भूमिका

मुंबई: मार्च महिना संपत असल्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने मालमत्ता कराची वसूली जोरात सुरु असून ज्या

मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५

आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या

मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना

मुंबई: अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नियोजित बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी