मोहित सोमण: एसईपीसी (Shriram Engeneering and Procurement Company SEPC Limited) कंपनीला २३० कोटीची नवी ऑर्डर मिळाली आहे. चिखला महाराष्ट्र येथे नव्या खाणकामाच्या अभियांत्रिकी कामाची कंत्राट निविदा कंपनीने जिंकल्याचे आज एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कंपनी या ट्रंकी प्रकल्प (Turnkey Project) माध्यमातून संबंधित अभियांत्रिकी कार्यास सुरुवात करेल असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. कंपनी ईपीसी कंपनी म्हणून ओळखली जाते त्यामुळे कंपनीने आपल्या ईपीसी पोर्टफोलिओशी संबंधित मोठ्या प्रमाणात ट्रंकी प्रकल्पात तसेच शासकीय निमशासकीय प्रकल्पाचे कंत्राट घेण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ही मोठी ऑर्डर कंपनीला मिळाल्याने कंपनीच्या पोर्टफोलिओत आणखी सु़धारणा अपेक्षित आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १६७.८५ कोटीची निचांकी बोली कंपनीने निविदेत प्राप्त केल्याने त्यांना यश आले. उर्वरित ३६.५३ लाख डॉलर मशिनरी व प्रकल्प उभारणीसाठी खर्च होईल असे त्यांनी म्हटले. या प्रकल्पामुळे चिकला खाणीतील खाण पायाभूत सुविधा आणि कार्यान्वयन कार्यक्षमता मजबूत होण्याची अपेक्षा कंपनीच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे
कंपनीने यावर अधिकृत भाष्य करताना,' या ऑर्डरमुळे एसईपीसी लिमिटेडचे खाण पायाभूत सुविधा क्षेत्रात अस्तित्व अधिक मजबूत होते आणि दीर्घ अंमलबजावणी चक्र असलेल्या गुंतागुंतीच्या, अधिक मूल्याच्या प्रकल्पांना सुरक्षित करण्याची कंपनीची क्षमता दिसून येते. कराराची रचना कार्यक्षम भांडवली वापरास समर्थन देते, तसेच अधिक अंदाजे आणि लवचिक महसूल प्रवाहासाठी योगदान देते.हा प्रकल्प व्याप्ती आणि अंमलबजावणीच्या स्पष्टतेद्वारे समर्थन असलेल्या मुख्य पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये निवडक वाढीवर कंपनीच्या लक्ष केंद्रीत करण्याला आणखी बळ मिळते.' असे म्हटले.
या घडामोडींवर भाष्य करताना एसईपीसी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक वेंकटरमणी जयगणेश म्हणाले आहेत की, 'एमओआयएलकडून मिळालेली ही ऑर्डर खाण पायाभूत सुविधा क्षेत्रात एसईपीसीच्या अंमलबजावणी क्षमतेला बळकटी देते आणि सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांचा सततचा विश्वास दर्शवते. कंपनी शिस्तबद्ध प्रकल्प अंमलबजावणीवर आणि मुख्य पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये आपले अस्तित्व विस्तारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.'
एसईपीसी लिमिटेड (पूर्वीची श्रीराम ईपीसी लिमिटेड) ही ईपीसी कंपनी पाणी आणि सांडपाणी, रस्ते, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि खाणकाम क्षेत्रांमध्ये टर्नकी उपाय असे विविध पोर्टफोलिओ असलेल्या सुविधा पुरवते. कंपनी संपूर्ण भारतातील मोठ्या आणि गुंतागुंतीच्या पायाभूत प्रकल्पांच्या डिझाइन, खरेदी, बांधकाम आणि कार्यान्वयनामध्ये विशेषज्ञ आहे.खासकरून एसईपीसी केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांसह विविध प्रकारच्या ग्राहकांना सेवा देते.
उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या सहामाहीत, एसईपीसीने ४५५ कोटी रुपयांचे एकत्रित एकूण उत्पन्न प्राप्त केले असून ५४ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए आणि २४.८५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (PAT) नोंदवला. त्या तुलनेत, आर्थिक वर्ष २५ मध्ये, कंपनीने ५९७.६५ कोटी रुपयांचा महसूल, ९८.९४ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए आणि २४.८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता.
२००० साली स्थापन झालेल्या व चेन्नईत मुख्यालय असलेल्या कंपनीला सप्टेंबर महिन्यात जिफोस सोलूशन (GFOS Solutions) कंपनीकडून ७५१.९८ कोटींची ऑर्डर मिळाल्याने कंपनीचा शेअर २४ सप्टेंबरला कंपनीचा शेअर १३.०४ या उच्चांकाला (All time High) पोहोचला होता.आज नव्या कंत्राटामुळे कंपनीचा शेअर सकाळी सुरुवातीला४% व १०.४८ वाजेपर्यंत ३.७६% वाढ झाल्याने प्रति शेअर १०.२० रूपयांवर व्यवहार करत आहे.