पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी, चिन्हाच्या वादावर निघाला तोडगा

पुणे  : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील आघाडीबाबत मोठी अनिश्चितता होती. कधी आघाडी होणार, तर कधी ती तुटल्याच्या बातम्या येत होत्या. आज या सर्व नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून दोन्ही राष्ट्रवादींमधील आघाडीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चिन्हाबाबतची अट मान्य केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार आपापल्या अधिकृत चिन्हांवर - ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’- निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यामुळे चिन्हांवरून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे.


पुणे महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला शरद पवारांच्या पक्षाने आघाडीत ६५ जागांची मागणी केली होती, तर अजित पवार यांच्या पक्षाकडून ३५ जागांची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र, दीर्घ वाटाघाटीनंतर अखेर जागावाटपावर तोडगा निघाला असून पुणे महापालिकेत अजित पवार यांचा पक्ष १२५ जागा, तर शरद पवार यांचा पक्ष ४० जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच आघाडीचा अंतिम फॉर्म्युला असणार असल्याची चर्चा आहे.


दरम्यान, आज दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, घोषणा होताच अजित पवार यांच्या पक्षाची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार आहे. यासाठी अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. सध्या दहा ते पंधरा जागांवरील उमेदवारीचा तिढा बाकी असून, त्यावर चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे