वर्षाअखेरीस अ‍ॅपल युजरसाठी धमाल ऑफर, विजय सेल्सद्वारे 'अ‍ॅपल डेज सेल' ची सुरूवात

२८ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ पर्यंत अ‍ॅपल शॉपिंग बोनान्‍झा


मुंबई: विजय सेल्‍स या भारतातील प्रमुख इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळीने आपल्‍या १६० हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्‍ये तसेच ऑनलाइन वेबसाइट www.vijaysales.com वर २८ डिसेंबर २०२५ पासून बहुप्रतिक्षित अ‍ॅपल डेज सेल सुरू केला आहे. हा सेल ४ जानेवारी २०२६ रोजी समाप्‍त होईल. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना या उत्पादनावर विशेष सुट मिळणार आहे. नवीन आयफोन्‍स, मॅकबुक्‍स, आयपॅड्स, वॉचेस्, एअरपॉड्स अशा डिवाईसेसचा समावेश असल्याचे विजय सेल्सने यावेळी स्पष्ट केले आहे.


विजय सेल्‍सचे संचालक निलेश गुप्‍ता म्‍हणाले आहेत की,'आम्‍हाला पुन्‍हा एकदा अ‍ॅपल डेज सेल घेऊन येण्‍याचा आनंद होत आहे. सूट व्‍यतिरिक्‍त हा सेल अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे एक प्रकारे सादरीकरण आहे.ज्‍यामध्‍ये ग्राहकांना अविश्वसनीय मूल्‍य मिळते. अद्वितीय डिल्‍स व एक्‍स्‍चेंज बोनससह आम्‍ही अ‍ॅपलप्रेमींना या निमित्ताने त्‍यांचे डिवाईसेस अपग्रेड करण्‍याची आणि स्‍टाइलमध्‍ये नवीन वर्षाची सुरूवात करण्‍याची संधी देत आहोत.'


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांसाठी विजय सेल्‍स आयफोन १७ खरेदीवर ३००० रूपयांचे मायव्‍हीएस रिवॉर्ड्स लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देणार आहे. स्‍टोअरमध्‍ये पुढील खरेदीवर अधिक सूटचा आनंद घेण्‍यासाठी हे पॉइण्‍ट्स रिडिम करता येऊ शकतात. विशेष बँक ऑफर्सचाही विजय सेल्‍सचा अ‍ॅपल डेज सेलमध्ये समावेश असणार आहे. अत्‍याधुनिक अ‍ॅपल तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या ग्राहकांसाठी हा सेल बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे असे कंपनीने म्हटले.


नवीन युजरसाठी नवीन आयफोन एअर, आयफोन १७, आयफोन १७ प्रो किंवा आयफोन १७ प्रो मॅक्‍स खरेदी करायचा असेल तर या उत्पादनावर पण लाभ मिळणार आहे. पूर्वीचे मॉडेल्‍स खरेदी करण्‍याची इच्छा असलेल्यानांही आयफोन १६, आयफोन १६ प्‍लस, आयफोन १६ई, आयफोन १५ देखील अत्‍यंत आकर्षक दरांमध्‍ये उपलब्‍ध आहेत असे कंपनीने म्हटले.


आणखी कशावर सुट असेल?


आयफोन्‍स, मॅकबुक्‍स, वॉचेस इत्‍यादींवर आकर्षक सूट व्‍यतिरिक्‍त अ‍ॅपल डेज सेलदरम्‍यान अ‍ॅपल अ‍ॅक्‍सेसरीज- चार्जर्स, केबल्‍स, पेन्सिल्‍स आणि केसेस देखील आकर्षक दरांमध्‍ये उपलब्‍ध


ऑफर कुठे मिळू शकेल?


निवडक अ‍ॅपल डिवाईसेसचे प्रात्‍यक्षिक व ओपन युनिट्स स्‍टोअर्समध्‍ये, तसेच www.vijaysales.com वर विशेष किमतींमध्‍ये उपलब्‍ध आहेत. हे स्‍पेशल युनिट्स मर्यादित प्रमाणात उपलब्‍ध आहेत आणि पुरवठा असेपर्यंत 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्‍य' या तत्त्वावर देण्‍यात येतील. स्‍टोअर्समध्‍ये अ‍ॅपलकेअर+ किंवा प्रोटेक्‍ट+ सह अ‍ॅपल कार सर्विसेसचा आनंद घेत नवीन खरेदी केलेल्‍या अ‍ॅपल डिवाईसेसचे ग्राहक डिव्हाईस सिक्युअर करू शकणार आहेत.


विजय सेल्‍स अ‍ॅपल डिवाईसेसची खरेदी केल्‍यास प्रोटेक्‍ट+ योजनेवर जवळपास २०% सूट देखील देत आहे यामुळे नवीन खरेदी केलेले डिवाईसेस सुरक्षित राहण्‍याची खात्री मिळेल.


अ‍ॅपल डिवाईसेस खरेदीसाठी आयसीआयसीआय व इतर निवडक बँकेचे कार्डधारक त्‍यांच्‍या खरेदींवर जवळपास १०००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात.


विजय सेल्‍स ग्राहकांना विजय सेल्‍स स्‍टोअर्समध्‍ये आणि vijaysales.com वर जवळपास १०००० रूपयांचा एक्‍स्‍चेंज बोनस देत आहे.


मायव्‍हीएस लॉयल्‍टी प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना स्‍टोअर्समध्‍ये व ईकॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी ०.७५% लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देतो. प्रत्‍येक मिळवलेल्‍या पॉइण्‍टचे मूल्‍य स्‍टोअर्समध्‍ये रिडम्‍प्‍शनच्‍या वेळी एक रूपया असेल असे कंपनीने म्हटले.

Comments
Add Comment

तारापूर अणुऊर्जा केंद्र परिसरात ड्रोनसह हवाई साधनांवर निर्बंध

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक परिसर व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पाकिस्तानात माजी लष्करी अधिकारी आदिल राजा 'दहशतवादी' घोषित

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने माजी पंतप्रधान इमरान खान यांचे समर्थक आणि माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांना

दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना

ऑपरेशन सिंदूरमुळे बंकरमध्ये लपण्याची वेळ!

पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांच्याकडून खुलासा इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या