नीता अंबानी यांनी सुरू केले कर्करोग व डायलिसिस केंद्र

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या ‘जीवन’ या नव्या शाखेचे उद्घाटन केले. हे रुग्णालय त्यांनी आपल्या दिवंगत वडील रवींद्रभाई दलाल यांच्या स्मरणार्थ समर्पित केले. उद्घाटनप्रसंगी मुकेश अंबानी उपस्थित होते. यावेळी पूर्णिमा दलाल, ममता दलाल तसेच अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनीही सहभाग घेतला. रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी नीता अंबानी यांनी म्हटले की, ‘जीवन’ हे माझ्या वडिलांना अर्पण केलेले एक श्रद्धास्थान आहे. त्यांनी मला नेहमी सेवा आणि करुणेचे महत्त्व शिकवले. समाजाची निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती असल्याचा संस्कार त्यांनी माझ्यावर केला. मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त नव्या शाखेची पायाभरणी करण्यात आली. रुग्णालयाच्या नव्या विभागात केमोथेरपीसह अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा तसेच डायलिसिस सेवाही येथे दिली जाणार असून मुलांसाठी स्वतंत्र केमोथेरपी वॉर्ड आहे.
Comments
Add Comment

मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक

मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे

कुर्ला येथील विविध परिसरातील ७१ अनधिकृत बांधकामांचे निष्कासन

अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने आदींचा कारवाईत समावेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’

Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीचा जल्लोष! काकड आरतीने सुरुवात; गायन, वादन, २२ जानेवारीला निघणार भव्य रथ शोभायात्रा

मुंबई : प्रभादेवीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य 'माघ श्री

Mumbai Western Express Highway | कांदिवलीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग

मुंबई : मालाड कांदिवलीच्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, मेट्रो

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट ...

अकोला : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याचा नादात एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून

Borivali-Gorai Jetty : बोरिवली-गोराई आता फक्त १५ मिनिटांत! तासनतासांच्या प्रवासातून मुंबईकरांची सुटका; रो-रो जेट्टीचं काम सुरू

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बोरिवली आणि गोराई