स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा


बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला मैदान असतं. मात्र तुम्ही कधी स्मशानभूमीतील शाळा पाहिली आहे का? बिहारमधील मुजफ्फरपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका स्मशानभूमीत मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एके ठिकाणी चितेला अग्नी दिला जात असताना दुसरीकडे मुलं अभ्यास करीत असल्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. ही स्मशानभूमी मुजफ्फरपूर येथील सिंकदरापूर ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. येथे एकीकडे चिता जळत असते तर दुसरीकडे बसून मुलं अभ्यास करतात. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे स्मशानभूमीत बसून अभ्यास करायला या मुलांना अजिबात भीती वाटत नाही. या मुलांनी स्वत: याबाबत सांगितलं. ते म्हणतात, की ते येथे आरामात बसून अभ्यास करतात. २०१७ मध्ये या स्मशानभूमीत शाळेची सुरुवात झाली. एकदा सुमीत कुमार नावाची व्यक्ती एकाच्या अंत्यसंस्कारासाठी येथे पोहोचली होती. त्यावेळी गरीब कुटुंबातील मुलं या स्मशानभूमीच्या जवळपास फिरत असल्याचं त्यांनी पाहीलं. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुमीतने शेवटी २०१७ मध्ये मुक्तीधाम स्मशानभूमीत एक शाळा सुरू केली.


स्मशानभूमीतील शाळेत १४० विद्यार्थी शिकतात...


सुरुवातीला मुलं स्मशानभूमीतील शाळेत जाण्यास घाबरत होते. मात्र हळूहळू सुमीतने मुलांना एकत्र केलं आणि आता स्मशानभूमीत १४० विद्यार्थी शिकतात. येथे पहिली ते अकरावीपर्यंतचे वर्ग घेतले जातात. याशिवाय मुलांना ड्रेस, बॅग, पुस्तकं, पेन्सिल, रबर, बसण्यासाठी आसनं आणि थंडीत स्वेटरची व्यवस्थाही शाळेकडून केली जाते. या शाळेत शिकणाऱ्या काही मुलांना आयपीएस व्हायचंय तर कोणाला इंजिनियर, तर काही डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतोय. येथील विद्यार्थ्यांना स्वसुरक्षेसाठी मार्शल आर्टचं प्रशिक्षण दिलं जातं. महिलांवर होणारे अत्याचार लक्षात घेता मुलांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी आणि जागरुक राहण्याचं शिक्षण दिलं जातं. १३० विद्यार्थी-विद्यार्थ्यांना दोन गटात विभागण्यात आलं आहे. सीनियर सेशनमध्ये एकूण ७० विद्यार्थी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यातील चांगली कामगिरी करणाऱ्या दहा मुलांची निवड केली जाते. या मुलांवर त्यांच्या घराजवळील कमीत कमी १० मुलांना शिकविण्याची जबाबदारी सोपवली जाते. तर ज्युनियर सेशनमध्ये ६० मुलांना वेगळं प्रशिक्षण दिलं जातं.

Comments
Add Comment

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा

Emergency Flight Landing : दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग; १५४ प्रवासी सुरक्षित

लखनौ येथे आज म्हणजेच शनिवार ११ एप्रिल सकाळी दुबईहून काठमांडूकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या फ्लाइटचे (एफजेड-1133)

Voters : एसआयआरमध्ये देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली

नवी दिल्ली : विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर देशातील 9 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात