मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या, पाकिस्तान पाचव्या, भारत सहाव्या आणि इंग्लंड सातव्या स्थानी आहे. ज्या संघाचे खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये जिंकण्याचे प्रमाण जास्त असेल त्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात वरचे स्थान देण्याची पद्धत आहे. या व्यवस्थेनुसार ऑस्ट्रेलियाने सात पैकी सहा सामने जिंकत ८५.७१ टक्के सामन्यांत विजय मिळवला आहे. यामुळे यादीत ते अव्वलस्थानी आहेत. न्यूझीलंडने तीन पैकी दोन तर दक्षिण आफ्रिकेने चार पैकी तीन कसोटी सामने जिंकले आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन पैकी एक कसोटी सामना जिंकला आहे. पण श्रीलंकेचा विजय हा पाकिस्तानच्या तुलनेत मोठा आहे. यामुळे गुणतक्त्यात श्रीलंका पाकिस्तानच्या तुलनेत वरच्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या चौथ्या कसोटीत गोलंदाजांचे अभूतपूर्व वर्चस्व पाहायला मिळाले. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला.
मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागून ...
यंदाच्या ॲशेस मालिकेत आतापर्यंत चार कसोटी सामने झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने तीन तर इंग्लंडने एक कसोटी सामना जिंकला आहे. मालिकेतील शेवटचा सामना आता ४ जानेवारी २०२६ पासून सिडनी येथे खेळवला जाईल.
मेलबर्न कसोटीआधी ऑस्ट्रेलियाचे विजयाचे प्रमाण १०० टक्के होते. पण मेलबर्न कसोटी पराभव होताच त्यांच्या विजयाचे प्रमाण एकदम घसरले आहे.