कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात. त्यामुळे या परिसरात १ जानेवारीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि नगर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियमावली जारी केली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतुकीतील हे बदल बुधवारी दुपारी २ वाजल्यापासून १ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.


पर्यायी मार्गाचे नियोजन

पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहतूक: पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपासवरून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रोड, केडगाव चौफुला, न्हावरा आणि शिरूर मार्गे पुढे जावे.


मुंबईकडून नगरकडे जाणारी वाहतूक: मुंबईहून येणाऱ्या वाहनांनी वडगाव-मावळ-चाकण-खेड-मंचर-नारायणगाव-आळेफाटा या मार्गाचा अवलंब करावा. तर हलकी वाहने पाबळ-शिरूर मार्गे जाऊ शकतात.


कोल्हापूर, सांगली, सातारा बाजूकडून नगरकडे: या भागातून येणारी वाहने मांतरवाडी फाटा, हडपसर आणि केडगाव चौफुला मार्गे शिरूरकडे वळवण्यात येणार आहे.


सोलापूर रोडकडून आळंदी-चाकणकडे: सोलापूर रोडने येणाऱ्या वाहनांनी हडपसर-मगरपट्टा चौक-खराडी बायपास आणि विश्रांतवाडी मार्गे पुढे जावे.




जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी थेऊर फाटा, हॅरिस ब्रिज, बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, नवले ब्रिज, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक आणि मरकळ ब्रिज या ठिकाणांहून जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तसेच आळंदी-तुळापूर पूल जड वाहनांसाठी बंद असून तिथून फक्त हलकी वाहने सोडली जातील.


पार्किंगची व्यवस्था
प्रशासनाने अनुयायी आणि पर्यटकांसाठी लोणीकंद, तुळापूर फाटा, पेरणे गाव आणि थेऊर रोड या ठिकाणी स्वतंत्र पार्किंगची सोय केली आहे. मुख्य ठिकाणांवर माहिती फलक लावण्यात आले असून वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या