सेबीकडून लाखो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा आता डुप्लिकेट प्रमाणपत्र घेणे झाले सोपे!

मुंबई: सेबीकडून एक महत्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. बाजार नियामक सेबीने (Security Exchange Board of India SEBI) ५ लाखांपर्यंत सिक्युरिटीज पोर्टफोलिओ असलेल्या कागदपत्रांची पूर्तता सोपी व सुटसुटीत केली होती त्याची मर्यादा आता १० लाखांपर्यंत केल्याचे आपल्या अधिनियमात स्पष्ट केले आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या सिक्युरिटीज डुप्लिकेट प्रमाणपत्र (Security Duplicate Certificate) मागणी केल्यास त्यांना त्वरित सोप्या सुटसुटीत प्रकियेतून जावे लागणार आहे. आधीच्या क्लिष्ट पद्धतीतून गुंतवणूकदारांना सुटका होईल. महत्वाची बाब म्हणजे १० लाखांपर्यंत सिक्युरिटीज असलेल्या गुंतवणूकदारांना ही सुट दिली असून सेबीने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी निर्णयापूर्वीच अर्ज केला आहे त्यांनाही ही तरतूद लागू होणार आहे.


त्यामुळे डिमटेरियलायझेशन (Dematerialisation) प्रक्रियेत गुंतवणूकदारांचा वेळ, खर्च दोन्ही वाचणार आहे. सेबीने आपल्या नवीन धोरणात्मक प्रकियेत हा नवा निर्णय घेतल्याचे कळवले आहे. खास बाब म्हणजे नोटरायझेशन (Notarisation) बाबतीतही छोट्या गुंतवणूकदारांची आता सुटका होणार आहे. म्हणजेच १०००० रूपयांपर्यंत बाँड खरेदी केलेल्या गुंतवणुकदारांना आता नोटरी करण्याची गरज नसल्याचेही सेबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. २५ मे २०२२ रोजी सेबीने हे परिपत्रक काढले होते. त्यांची त्वरीत अंमलबजावणी करण्याचा सेबीने हा निर्णय घेतला आहे.


केवळ गुंतवणूकदारांना नाही तर सगळ्या सूचीबद्ध कंपन्यांना (Listed Companies) डिमटरेलायझेशनचे सगळे नवे नियम लगेच प्रकियेत लागू करण्याचेही निर्देश दिले आहेत. ज्यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला असेल त्यांना पुन्हा कागदपत्रे नव्या नियमानुसार मागू नका असेही आदेश आरटीए (Registar and Transfer Agents RTAs) दिले असल्याचेही सेबीने नमूद केले आहे. त्यामुळे सेबीने घेतलेल्या निर्णयामुळे लाखो गुंतवणूकदारांना यांचा फायदा होणार आहे. प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजात यात सुधारणा आल्याने अनेक भौतिक कागदपत्रे अथवा प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात वेगात जतन होणार आहेत. याविषयी नमूद करताना सेबीने म्हटले आहे की की,'जारी केल्या जाणाऱ्या डुप्लिकेट सिक्युरिटीज मूलतः डिमटेरियलाइज्ड स्वरूपात असल्याने ही पावले बाजार प्रणालीमध्ये डिमटेरियलायझेशन वाढविण्यातही योगदान देतील.'


हे सुधारित फ्रेमवर्क सेबीच्या २५ मे २०२२ रोजीच्या पूर्वीच्या परिपत्रकानुसार आहे असेही सेबीने अंतिमतः स्पष्ट केले आहे. त्या पूर्वीच्या परिपत्रकात डुप्लिकेट सिक्युरिटीज प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या आणि कार्यपद्धतीच्या आवश्यकता तसेच मर्यादा विहित केल्या होत्या. ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी, सेबीने विद्यमान नियमांचे पुनरावलोकन (Review) केला असून सुधारित मर्यादा व कागदपत्रांच्या नव्या नियमाची प्रस्तुती यानिमित्ताने केली आहे.

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७