BJP : संसदेचे विशेष अधिवेशन, भाजपच्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी

नवी दिल्ली : संसदेचे विशेष अधिवेशन १६ ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनाकरिता भारतीय जनता पक्षाने खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. विशेष अधिवेशनात कामकाजासाठी हजर राहा असे स्पष्ट निर्देश भाजपने पक्षाच्या सर्व खासदारांना दिले आहेत. विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून व्हिप जारी करण्यात आला आहे.


गुरुवार ते शनिवार, १६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीसाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व भाजप सदस्यांना तीन ओळींचा व्हिप बजावण्यात आला आहे. व्हिपचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश भाजपने सर्व खासदारांना दिले आहेत. हा व्हिप पंतप्रधान मोदींसह भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्यांना बंधनकारक आहे.


नारी शक्ती वंदन कायद्याने महिलांचे आरक्षण नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडले होते. कोरोना संकटामुळे जनगणनेला विलंब झाल्याने २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात महिला आरक्षण लागू करण्यासाठी विशेष अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Nashik Crime : 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, मग प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या जोडीदाराचा काटाच काढला ; अन् मृतदेह...

Nashik Crime : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा (Live-in Relationship) रक्तरंजित शेवट

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती