माहिममध्ये दोन जागांवर बोळवण, मनसे उबाठावर नाराज

माहिम विधानसभा उबाठा आणि मनसेची ठरणार डोकेदुखी


कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी सूर उमटवायला सुरुवात झाली


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंमध्ये एकमत झाल्याने उबाठा आणि मनसेमधील युती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा सोडवून जागांचे सोडण्यावर शिक्कामोर्तब केले जात आहे. मात्र, या जागा वाटपात माहिम विधानसभेतील प्रभाग हे उबाठा आणि मनसेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. माहिममध्ये मनसेने उबाठाकडे तीन प्रभागांची मागणी केली होती, परंतु उबाठाने मनसेची केवळ दोनच जागांवर बोळवण केली आहे. त्यामुळे निवडून येणारी हक्काची जागा न सोडता दुसरा प्रभाग सोडल्याने मनसेमधील ही नाराजी प्रचंड उफाळून येण्याची शक्यता आहे.

माहिम विधानसभा मतदार संघात प्रभाग क्रमांक १९०, प्रभाग क्रमांक १९२ आणि प्रभाग क्रमांक १९४वर मनसेने दावा केला होता. या पैंकी प्रभाग क्रमांक १९२ आणि प्रभाग क्रमांक १९४ हे मनसेसाठी अत्यंत पुरक आहेत आणि उबाठाच्या मदतीने हे प्रभाग अधिकच सुरक्षित बनले आहेत. त्यानुसार अखेर उबाठाने मनसेला प्रभाग क्रमांक १९० आणि प्रभाग क्रमांक १९४ सोडण्याचा निश्चय केला. त्यानुसार प्रभाग क्रमांक १९२ हा जिथे उबाठाचा नगरसेवक आहे, तेथील नगरसेविका प्रिती पाटणकर आणि माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांचा प्रभाग कायम राखला जाणार हे निश्चित झाले होते. परंतु त्यानंतर मनसेचे चक्रे फिरली आणि प्रभाग १९४ हा उबाठाला सोडून १९२ मनसेला देण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे आता मनसेला प्रभाग क्रमांक १९० आणि १९२ हे दोन प्रभाग सोडले जाणार आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा यशवंत किल्लेदार यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे. परंतु प्रभाग क्रमांक १९४मधून मनसेचे उमेदवार म्हणून यशवंत किल्लेदार यांच्यासाठी पुरक नसल्याने तसेच उबाठातील पदाधिकाऱ्यांची नाराजी असल्याने तिथे शिवसेनेचे समाधान सरवणकर यांच्यासमोर लढत देणे शक्य नसल्याने आपल्यासाठी १९२ प्रभाग आपल्याकडे घेवून प्रभाग १९४ उबाठाला सोडण्याच्या सूचना केल्या गेल्या आणि त्यानुसार मनसेने प्रभाग १९० आणि प्रभाग १९४ घेण्यास मान्यता दिली आहे.

संदीप देशपांडे नाराज का?


मनसेचे नेते संदीप देशपांडे हे निवड प्रक्रियेत आपल्याला न घेतल्याने नाराज असल्याचे प्रसार माध्यमांनी वृत्ते दिली. परंतु देशपांडे यांनी माध्यमांना यापूर्वीपासून आपण जागा वाटपाच्या निवड प्रक्रियेत नसल्याचे वारंवार सांगितले होते. देशपांडे यांची नाराजी ही प्रभाग क्रमांक १९४ जो मनसेला पुरक आहे, तो उबाठाला दिल्यामुळे होती. त्यामुळे संदीप देशपांडे हे नाराज असल्याचे वृत्त पसरताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना शिवतिर्थावर बोलावून स्वत:सह चायपान आणि जेवण करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रभाग १९४ हा मनसे जिंकू शकतो आणि तिथे समाधान सरवणकरला टक्कर देणारा उमेदवार असताना उबाठाला सोडणे हेच मुळी नाराजीचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.

प्रभाग क्रमांक १९० मनसेसाठी कठीण


प्रभाग क्रमांक १९० हा मनसेला सोडण्यात आला आहे. याठिकाणी सध्या भाजपाच्या नगरसेविका शीतल गंभीर देसाई असून पुन्हा त्या भाजपाच्या तिकीटावर उभ्या राहणार आहेत.हा प्रभाग मनसेला सोडण्यात आल्याने मागील पाच ते आठ वर्षांपासून मेहनत करणाऱ्या उबाठाचे राजू पाटणकर आणि त्यांची पत्नी वैशाली पाटणकर यांचा पत्ता कापला जाणार आहे. या मतदार संघात मुस्लिम मतदार असल्याने येथील मुस्लिमांचे मतदान हे मनसेला पेक्षा उबाठाला झाले असते. त्यामुळे मनसेला १९० न सोडता प्रभाग १९२ आणि १९४ हे दोन प्रभाग सोडता आले असते. त्यामुळे या दोन्ही प्रभागातील मनसेचे उमेदवार निवडून येण्याची शक्यताच कमी असल्याचे बोलले जात आहे.

माहिममध्ये दोन पाटणकर कुटुंबावर अन्याय


प्रभाग क्रमांक १९२ हा मनसेला सोडल्याने तेथील उबाठाच्या स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर आणि माजी नगरसेविका प्रकाश पाटणकर यांचा पत्ता कापला गेला आहे. तर प्रभाग क्रमांक १९० मनसेला सोडल्याने उबाठाचे इच्छुक वैशाली पाटणकर आणि राजू पाटणकर यांचाही पत्ता कापला गेला आहे. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे या माहेरच्या पाटणकर असून त्यांच्या आडनाव बंधूंचे पत्ते मनसेच्या मनोमिलनामुळे कापले गेले आहे.
Comments
Add Comment

काँग्रेसचे ठरले, वंचित बहुजन आघाडीला सोडणार ६०पेक्षा अधिक जागा?

यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडण्याची दाट शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यावर निवडणूक विभाग ठाम

जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची नावे त्वरित कळवण्याचे केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी)

‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा

मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५०

पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप)

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८