भारतीय महिलांचा श्रीलंकेवर एकतर्फी मालिका विजय

शफाली वर्माची ७९ धावांची वादळी खेळी


नवी दिल्ली : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा सामना ८ विकेट्सने जिंकत एकतर्फी मालिका विजय नोंदवला आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांसह शफाली वर्माने वादळी कामगिरी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शफाली वर्मा अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेच्या संघाला एकटीच भारी पडली. यासह पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने ३-० च्या फरकाने जिंकली आहे.


दोन सामने विशाखापट्टणममध्ये खेळवल्यानंतर तिसरा सामना तिरुअनंतपुरम खेळवला गेला व या सामन्यातही भारतीय संघाने आपला दबदबा कायम ठेवला. हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यासह श्रीलंकेचा संघ ११२ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १३.२ षटकांत सामना जिंकला.


श्रीलंकेने दिलेल्या ११३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती-शफाली फलंदाजीला उतरल्या. स्मृती मानधना तिसऱ्या सामन्यातही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली व १ धाव करत पायचीत होत बाद झाली. तर शफाली वर्माने गेल्या सामन्यातील फॉर्म कायम ठेवत २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. जेमिमा रॉड्रीग्ज ९ धावा करत बाद झाली. शफाली वर्माने या सामन्यात ४२ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७९ धावांची वादळी खेळी केली. शफाली वर्माला कर्णधार हरमनप्रीत कौरने चांगली साथ दिली. हरमनप्रीतने २१ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाने दणदणीत विजय मिळवला.


प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने सुरुवात चांगली केली, पण मोठी धावसंख्या पुन्हा एकदा अपयशी ठरली. कर्णधार चमारी अट्टापटू लवकर बाद झाली. तर हसीनी परेराने २५ धावांची चांगली खेळी केली. तर इमेशा दुलानी २७ व कविशा दिल्हारी यांनी २० धावांची खेळी केली. कौशिनीने १९ धावांचे योगदान दिले. एकही खेळाडू अर्धशतक करू शकला. तर भारताकडून रेणुका सिंग ठाकूर व दीप्ती शर्माने उत्कृष्ट


गोलंदाजी केली. रेणुका सिंगने ४ षटकांत २१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.


दीप्ती शर्माने ३ विकेट्स घेतल्या. यासह दीप्ती शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५१ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

Comments
Add Comment

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस