गुहागर : नाताळच्या सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी गुहागरला गेलेल्या मुथ्या कुटुंबातील तीन सदस्य समुद्रात बुडाले. स्थानिकांनी आणि जीवरक्षकांनी तप्तरता दाखवल्यामुळे बुडालेल्यांपैकी मायलेकाचे प्राण वाचले. पण कुटुंबप्रमुख असलेल्या ४२ वर्षांच्या अमोल मुथ्या यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज म्हणजेच शनिवार २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली.
समुद्रात तीन जण बुडत असल्याची माहिती मिळताच परिसरात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या जीवरक्षकांनी आणि स्थानिकांनी तप्तरतेने कारवाई केली. स्थानिकांच्या आणि जीवरक्षकांच्या तप्तरतेमुळे बुडत असलेल्या तीन जणांपैकी दोघांचे प्राण वाचले. पण अमोल मुथ्या यांना वाचवण्याची संधीच स्थानिकांना आणि जीवरक्षकांना मिळाली नाही.
मुथ्या कुटुंब मुंबईत पवई परिसरात वास्तव्यास आहे. सुटीनिमित्त कुटुंब सहलीसाठी गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर आले होते. समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि मुथ्या कुटुंब बुडू लागले. समुद्रात तीन जण बुडत असल्याची माहिती मिळताच परिसरात कर्तव्यावर (ड्युटीवर) असलेल्या जीवरक्षकांनी आणि स्थानिकांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी १४ वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या आईला वाचवले. पण अमोल मुथ्या यांना वाचवण्यात स्थानिक आणि जीवरक्षक अपयशी ठरले.