उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र
उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या मॅनेजरवर वाढदिवसाच्या पार्टीनंतर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील पीडीतेवर घरी सोडण्याच्या बहाण्याने चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडीतेने सांगितल्याप्रमाणे, तिच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), एक महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीने २० डिसेंबर रोजी पार्टीनंतर तिला कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत समोर आली आहे.
एफआयआरमध्ये पार्टी, आफ्टर पार्टी, कार राइड, धूम्रपान आणि सामूहिक बलात्कारासह संपूर्ण घटनेचा तपशील आहे. ही घटनेबाबत उदयपूरच्या सुखेर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यात आयटी कंपनीचा सीईओ, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. एफआयआरनुसार, २० डिसेंबर रोजी कंपनीने सीईओचा वाढदिवस आणि नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पार्टी आयोजित केली होती. उदयपुरच्या शोभागपुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पीडिता रात्री ९ वाजता हॉटेलमध्ये पोहोचली, जिथे कंपनीचे अनेक कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही पार्टी मध्यरात्री सुमारे १:३० वाजेपर्यंत चालली ज्यात मद्याचा समावेश होता.
कराची: पाकिस्तानमधील ढासळलेली आर्थिक स्थिती आणि राजकीय अस्थिरता यामुळे गेल्या दोन वर्षांत हजारो डॉक्टर, इंजिनिअर्स आणि अकाउंटंट्सनी देश सोडला आहे. ...
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, पार्टी दरम्यान पीडितेची तब्येत बिघडली आणि ती अर्धबेशुद्ध अवस्थेत पडली. दरम्यान, काही लोक तिला घरी सोडण्याबद्दल बोलत असताना, कंपनीच्या महिला कार्यकारी प्रमुखांनी तिला आफ्टर पार्टीसाठी आमंत्रित केले. मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास, पीडितेला कंपनीचे सीईओ आणि महिला कार्यकारी प्रमुखाच्या पतीने कारमध्ये बसवण्याची जबरदस्ती केली. यानंतर पीडितेला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिघेही आरोपी त्यांच्या कारमधून निघून गेले. तथापि, वाटेत एका दुकानात त्यांनी धूम्रपानासाठी गाडी थांबवली आणि पीडितेलाही धूम्रपान करण्यास भाग पाडले. यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती अस्वस्थ अवस्थेत पडली होती.
शुद्धीवर येताच तिने सीईओला तिचा छळ करताना पाहिले. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे तिच्या लक्षात आले. एफआयआरमध्ये असेही म्हटले आहे की, पीडितेने आरोपींना वारंवार तिला जाऊ देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी ऐकण्यास नकार दिला. तर बलात्कार केल्यानंतर सकाळी ५ वाजता घरी सोडले. जेव्हा तिला शुद्धीवर आली, तेव्हा तिला आढळले की तिचे एक कानातले, मोजे आणि अंतर्वस्त्र गायब असून तिच्या गुप्तांगांवर जखमा होत्या. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा पीडितेने केला आहे. ते म्हणजे तिने कारच्या डॅशकॅमचा ऑडिओ आणि व्हिडिओ तपासला. ज्यात संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. या डॅशकॅमच्या आधारावर पीडीतेने सीईओ, महिला कार्यकारी प्रमुख आणि तिच्या पतीवर गु्न्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, एफआयआरमधील सर्व तथ्ये, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे आणि डॅशकॅम फुटेज तपासले जात आहेत.