चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय


नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी दोन ऐतिहासिक निर्णय घेतले. एकीकडे चीनमधून होणाऱ्या स्वस्त आयातीला रोखण्यासाठी 'अँटी-डंपिंग' शुल्क लागू करण्यात आले आहे, तर दुसरीकडे कोळसा आणि लिग्नाइट खाणी सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत केली आहे.


चीनकडून होणाऱ्या स्वस्त आणि अयोग्य आयातीमुळे भारतीय उत्पादकांचे मोठे नुकसान होत होते. यावर लगाम लावण्यासाठी वित्त मंत्रालयाने चीनच्या दोन प्रमुख उत्पादनांवर पुढील पाच वर्षांसाठी अँटी-डंपिंग शुल्क लागू केले आहे.


कोळसा खाणींसाठी ‘लालफितीचा कारभार’ संपणार


केंद्र सरकारने ‘कोलियरी कंट्रोल रूल्स, २००४’ च्या नियम ९ मध्ये सुधारणा केली आहे. या बदलामुळे कोळसा आणि लिग्नाइट खाणी सुरू करणे अधिक सोपे होणार आहे. यापूर्वी खाण सुरू करण्यासाठी किंवा १८० दिवसांहून अधिक काळ बंद असलेली खाण सुरू करण्यासाठी ‘कोळसा नियंत्रक संघटनेची’ पूर्वपरवानगी अनिवार्य होती. आता ही अट रद्द करण्यात आली.

Comments
Add Comment

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये शुक्रवारी

‘हा तर संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का’

एअर प्युरिफायरवरील जीएसटी कपातीच्या हायकोर्टाच्या सूचनेवर केंद्र सरकारचा आक्षेप नवी दिल्ली : जीएसटी कमी

अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही !

भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा सुमारे तीन हजार हल्ल्यांचा पुरावा नवी दिल्ली : बांगलादेशातील ढासळती

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका