सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले

मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली. स्वत: पंतप्रधानांनी या परिषदेला हजेरी लावली. या परिषदेत मेरिटाइम क्षेत्रातील करिअर संधींवर भर देण्यात आला. पुढील काळात या क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून ७ लाख नवीन रोजगार निर्माण होणार असल्याची घोषणा केंद्रीय बंदरे व जलवाहतूक मंत्र्यांनी केली.

पुढील काळात भारतात सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या सीफेअरर्स (समुद्रमार्गाने वाहतूक करणारे कर्मचारी) यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार आहे. देशातील बंदरांची क्षमता जवळपास दुप्पट झाली असून त्यामुळे कार्गो(माल वाहतूक) हाताळण्याची क्षमता वाढेल. भारतातील बंदरे आता जागतिक पातळीवर स्पर्धक ठरली आहेत. पंतप्रधानांनी या परिषदेत पुढील २५ वर्षांत नीलक्रांती घडवण्याचे उद्दिष्ट मांडले, यामुळे भारतास मेरिटाइम क्षेत्रात जागतिक नेतृत्वाची संधी मिळेल. ही परिषद ८५ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. ६८० सामंजस्य करार झाले. या सर्व बाबी लक्षात घेता सागरी क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण हे भविष्यात उत्तम करिअरसाठी उपयुक्त ठरू शकते. या परिषदेत इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीचा (आयएमयू) महत्त्वाचा सहभाग होता. ही युनिव्हर्सिटी भारत सरकारच्या बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक राष्ट्रीय विद्यापीठ आहे. तिचा उद्देश भारतात मेरिटाइम शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि विकासाला चालना देणे हा आहे.

भविष्यात मेरिटाइम उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी आयएमयूला महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. या परिषदेत आयएमयूने डिजिटल शिपिंग, ग्रीन पोर्ट्स, आणि स्मार्ट लॉजिस्टिक्स यासारख्या विषयांवर सत्रांचे आयोजन केले. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील या क्षेत्रातील रोजगार संधीची माहिती मिळाली. तसेच जवळपास १०० आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या फोरममध्येही आयएमयूने सहभाग घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील थेट संपर्क आणि नोकरीच्या संधी मिळण्यासाठी एक सक्षम संपर्क साखळी निर्माण होण्यास साहाय्य झाले. या परिषदेमध्ये आयएमयूने आपले अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प, आणि विद्यार्थ्यांचे नवकल्पनात्मक मॉडेल्स प्रदर्शित केले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग प्रतिनिधींना भारतातील मेरिटाइम शिक्षणाची गुणवत्ता समजली.

आयएमयूचे कॅम्पस आणि अभ्यासक्रम


(१) चेन्नई कॅम्पस – बी.एस्सी इन नॉटिकल सायंस, बी.टेक मरीन इंजिनीअरिंग, एम.बी.ए पोर्ट अॅण्ड शिपिंग मॅनेजमेंट, एम.बी.ए इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अॅण्ड लॉजिस्टिक्स, (२) मुंबई पोर्ट कॅम्पस – डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, (३) नवी मुंबई कॅम्पस – बी.बी.ए मॅरिटाइम लॉजिस्टिक्स (अप्रेंटिससह), डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, (४) कोलकाता कॅम्पस – बी.टेक नेव्हल आर्किटेक्चर अॅण्ड ओशन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स, (५) कोचीन कॅम्पस – बी.टेक मरीन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, बी.बी.ए लॉजिस्टिक्स, रिटेलिंग अॅण्ड ई-कॉमर्स, एम.टेक मरिन इंजिनीअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, (६) विशाखापट्टणम कॅम्पस – बी.टेक नेव्हल आर्किटेक्चर अॅण्ड शिप बिल्डिंग इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स, एम.टेक नेव्हल आर्किटेक्चर अॅण्ड ओशन इंजिनीअरिंग, एम.टेक ड्रेजिंग ॲण्ड कोस्टल इंजिनीअरिंग

करिअर संधी : आयएमयूमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्रांमध्ये करिअर संधी उपलब्ध होतात- (१) जहाज चालवणे (२) मरीन इंजिनीअरिंग (३)पोर्ट मॅनेजमेंट (४) लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन (५) शिपिंग कंपन्या (६) कोस्ट गार्ड (७)आंतरराष्ट्रीय मरीन उद्योग ओशन इंजिनीअरिंग. या शाखेत या बाबींच्या शिक्षण-प्रशिक्षणावर भर दिला जातो. या अभ्यासक्रमात सागरी वाहतूक आणि सागरीय पर्यावरणाच्या अानुषंगाने डिझाइन, निर्मिती, विकास, कार्यान्वयन, नियोजन यांचं प्रशिक्षण दिलं जातं. नॅव्हल आर्किटेक्चर ही ओशन इंजिनीअरिंगची उपशाखा असली तरी आता त्याकडे स्वतंत्रपणे लक्ष पुरवलं जातं. (अपूर्ण)
Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील