गोवा अग्निकांडाहबद्दल महत्त्वाची अपडेट! लुथरा ब्रदर्सच्या कोठडीत वाढ

पणजी: गोव्यातील मापुसा न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या पोलिस कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ केली असल्याची अपडेट समोर आली आहे. गौरव आणि सौरभ हे गोव्याच्या रोमियो लेन येथील बर्च नाईट क्लबचे मालक आहेत. क्लबला लागलेल्या आगीमुळे त्यांना १० दिवसाच्या पोलास कोठडीची सुनावण्यात आली होती. ज्याची मुदत आज संपली असली तरी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत २९ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

सौरभ आणि गौरव लुथरा यांचे वकील पराग राव यांनी सांगितल्यानुसार, तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करायचे असल्यामुळे या अतिरिक्त पोलीस कोठडीसाठी कोणताही विरोध दर्शवला गेला नाही. सध्या लुथरा ब्रदर्स अंजुना पोलिसांच्या ताब्यात आहेत. क्लबला आग लागली तेव्हा हे भाऊ प्रत्यक्ष स्थळी उपस्थित नसले तरी अंजुना पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.





नाईट क्लब अग्निकांडाचा घटनाक्रम


गोव्यातील अर्पोरा गावातील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबला ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री भीषण आग लागली होती. या आगीत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नाईटक्लबमधील 'ती' रात्र आपल्यासाठी शेवट ठरेल असा विचारही कोणी केला नव्हता. मात्र सिलेंडरच्या झालेल्या स्फोटाने २५ जणांवर घाला केला. या घटनेनंतर काही तासांमध्येच सौरभ आणि गौरव लुथरा थायलंडला पळून गेली होते. मात्र पसार झालेल्या लुथरा बंधूंविरुद्ध थायलंड सरकारने हद्दपारीची प्रक्रीया पूर्ण केली आणि त्यांना १७ डिसेंबर रोजी पुन्हा देशात आणण्यात आले.


लुथरा बंधूंना ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले होते, तिथे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून गोवा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना गोव्यात आणण्यात आले असून पुढील सर्व चौकशी गोव्यातच होत आहे.

Comments
Add Comment

Nashik : कांद्याची दिल्लीवारी ! लासलगावहून ८४० टन कांदा दिल्लीला रवाना होणार

Nashik : देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

MPSC Paper Leak News : प्रेयसीसाठी पठ्ठ्याने फोडला 'एमपीएससी'चा पेपर

- पोलिसांच्या अहवालानंतर परीक्षा प्रक्रिया रद्द; एका प्रेमकहाणीमुळे हजारो उमेदवारांच्या करिअरला फटका मुंबई :

CM Devendra Fadnavis : विरोधी पक्षाच्या खासदारांना DPDC मधून निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning and Development Committee) निधीवाटपात सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता विरोधी