मोह

प्राची परचुरे-वैद्य, आत्मज्ञान

भाणूस जन्माला आला की त्याचे आयुष्य सुरू होते ते अगदी मरेपर्यंत. त्या आयुष्याच्या प्रवासात अनेक सुखदुःखाचे क्षण येतात. आयुष्याच्या प्रवासात अनेक अडचणी, अडथळे येत असतात. अनेकदा अवघड परिस्थिती निर्माण होते, तेव्हा आपले मन भांबावून जाते. भांबावलेल्या क्षणी मन थाऱ्यावर नसतं. अवघड परिस्थितीतून कसा मार्ग काढावा याचाच सतत विचार सुरू होतो. अवघड परिस्थिती मग ती मानसिक किंवा आर्थिक परिस्थितीची पण असू शकते, अशावेळी मोहाचे क्षणही समोर येतात. मोह म्हणजे भूरळ पाडणारा क्षण.

माणसाला कधी पैशाचा, संपत्तीचा... सोन्या नाण्याचा किंवा प्रसिद्धीचा इ. प्रकारचे अनेक भुरळ घालणारे विचार मनात येतात आणि मग असं वाटायला लागतं. एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असे आपले मन आपल्याला सांगू लागतं आणि नकळत आपण मोहाच्या जाळ्यात सापडतो आणि आता कुठे थांबावं हेच कळत नाही. मन आणि बुद्धी त्या क्षणी दोन्हीही हतबल होते. खरे तर परिस्थितीने आपल्याला ती वाट दाखवलेली असते; परंतु आता या मोहापासून कसे दूर जावे तेच कळत नाही. पण यातूनच खोटे बोलणे, फसवणूक करणे, लबाडी करणे, गंडा घालणे इ. सारखे गुन्हे घडण्यास सुरुवात होते.

मोह- मायेच्या खेळात सारेच जण अडकले आहेत... पण हे सारं काही झूठ आहे. आपल्याला माहीत आहे की जे आपण मिळवत आहोत किंवा मिळवणार आहोत हे सर्व नश्वर आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मनुष्य सुखाच्या शोधात आहे. नोकरी, संसार या सर्व गोष्टींमध्ये गुरफटून गेला आहे. पण या सर्वांचा विचार करायला त्याच्याजवळ वेळ कुठे? सारं काही इथेच ठेवून जायचं आहे.. काही सोबत घेऊन जाता येणार नाही हे माहीत असून सुद्धा मोह काही सुटता सुटत नाही. या मोह मायेमुळे मोक्ष मिळत नाही. मन कायम अतृप्त इच्छा, भावना घेऊन जगत असतो आणि एके दिवशी अचानक मरण पावतो; परंतु सतत मोहमायात अडकल्याने मृत्यूनंतरच प्रवासही सुखकर होत नाही. ८४ लक्ष योनीच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा तो जीव अडकत जन्म घेतच राहतो. आणि मागच्या जन्माचे हिशोब चुकते करता करता पुन्हा नवीन मोहाच्या पाशात अडकून पडतो. हे चक्र थांबत नाही. अविरत चालूच राहते. घडते ते फक्त आणि फक्त मोहामुळे, मनाला आवर न घालता आल्यामुळे. त्यामुळे प्रत्येक कृती करताना पूर्ण विचारांती करावी किंवा घरातील ज्येष्ठांचा विचार घ्यावा किंवा चांगल्या मित्र मैत्रिणींचा सल्ला घ्यावा. घरात चर्चा करावी आणि सर्वांच्या विचारांती निर्णय घ्यावा.
Comments
Add Comment

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा

संत कबीर

पंडित होय के आसन मारे पंडित होय के आसन मारे, लंबी माला जपत है। अंतर तेरे कपट करतनी, सो भी साहब लिखता है ।। - डॉ.

महर्षी याज्ञवल्क्य 

भारतीय ऋषी वैशंपायनांच्या आश्रमातून सांजसमयी बाहेर पडलेले याज्ञवल्क्य पूर्ण रात्रभर चालतच होते. अरुणोदयाच्या

सत्संग : अंतर्मुखतेकडून आत्मोन्नतीकडे

प्राची परचुरे वैद्य मानवी जीवन हे केवळ भौतिक गरजांच्या पूर्ततेपुरते मर्यादित नसून ते विचार, मूल्ये, भावना आणि