उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान


उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय केले? राऊत हे मराठी माणसासाठी तुरुंगात गेले की, पत्राचाळ घोटाळ्यामुळे तुरुंगात गेले? राऊत यांनी आयुष्यात मराठी माणसाच्या भल्यासाठी केलेले एक तरी काम दाखवावे, आपण त्यांना हजार रुपये देऊ असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी राऊतांना दिले. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊतांनी मराठी माणसांची घरे लुटली, भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सातत्याने मराठी माणसाच्या हितासाठी जीवाचे रान केले असेही त्यांनी नमूद केले.


ज्या बीडीडी चाळीत मुख्यमंत्री देवेंद्रजींनी किफायतशीर किंमतीत मराठी माणसाला घरे दिली, त्याच बीडीडी चाळीतील घरांची किंमत ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री असताना तब्बल 50 लाख इतकी ठेवली होती याची आठवण करून देत श्री. बन यांनी उबाठा गटावर शरसंधान साधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली 10 कामे सांगावी असे बालीश विधान करणा-या राऊतांना लक्ष्य करत श्री. बन म्हणाले 10 कामेच कशाला, 100 कामांची माहिती देतो. मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, रस्ते, पायाभूत सुविधा, घरे ही आणि असंख्य कामे देवेंद्रजींनी केली असल्याचे ते म्हणाले.


उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत मुस्लिम मतांसाठी लांगुलचालन केले. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि खुर्ची पटकावली. उद्धव यांच्या हीन कृत्यामुळेच मतदारांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांना मिळाला मुस्लीम मते मिळवण्यासाठी उबाठा गट ‘मुस्लिम लीग’सारखा पक्ष झाल्याची बोचरी टीकाही श्री. बन यांनी केली.


उबाठा गट - मनसेची युती झाली असा बोभाटा करणा-या राऊतांची, पत्रकारांनी जेव्हा राज यांना जागावाटपाची आकडेवारी सांगा असे विचारले तेव्हा त्यांची गाळण उडाल्याचे सर्वांनी पाहिले असे नमूद करत


श्री. बन म्हणाले की, खुर्चीसाठी ‘वंदे मातरम्’ ला विरोध करणा-यांसोबत उबाठा गट बसला आहे. हिंमत असेल तर राऊतांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ जाहीरपणे व्यासपीठावरून म्हणावे.


पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी उबाठा आणि राऊतांची अवस्था


श्री. बन म्हणाले की, पिंजरा चित्रपटातील मास्तरसारखे तुणतुणे घेऊन काँग्रेसच्या पायाशी रहाण्याची, वंदनीय बाळासाहेबांचा भगवा दूर करत हिरव्या मतांसाठी लाचारी करण्याची वेळ उबाठा गट आणि राऊतांवर ओढवली आहे.


मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेत श्री. बन यांनी देशपांडेंवर निशाणा साधला. ज्यांच्याकडे विचार, आचार आणि भूमिका नाही, त्यांनी ॲड.शेलार यांच्यावर टीका करू नये. ज्यांना सुपारी घेण्याची, सेटलमेंट करून राजकारण करण्याची सवय आहे, त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये.


भाजपाने कधीही भाषिक- प्रांतीय वाद निर्माण केला नाही


ठाकरे बंधूंची युती ही पराभवाच्या भीतीतून निर्माण झालेली युती आहे असे श्री. बन यांनी नमूद केले. निवडणुका आल्या की मराठी माणूस, मराठी अस्मिता, मुंबई तोडण्याचा बागुलबुवा निर्माण करण्याचे काम मनसे आणि उबाठा गट करतात असा प्रहार श्री. बन यांनी केला. भाषिक, प्रांतीय वाद निर्माण करण्याची परंपरा ही उबाठा गट आणि मनसेची आहे. मनसेनेच अमराठी माणसांना मारहाण केली, भाषेच्या नावावर, प्रांतवादाच्या नावावर सर्वसामान्य मुंबईकरांना मारले. भाजपाने कधीही मराठी- अमराठी वाद निर्माण केला नाही. म्हणूनच मुंबईकर आणि मराठी माणूस भाजपा, महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास श्री. बन यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक