राज्यसभा हुकलेल्या राहुल शेवाळेंवर लवकरच मोठी जबाबदारी?

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना संधी देऊन ‘धक्कातंत्र’ वापरल्याने नाराज झालेले माजी खासदार राहुल शेवाळे यांची मनधरणी करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यसभेची संधी हुकलेल्या शेवाळे यांच्यावर लवकरच केंद्रात पक्षाची मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते.


राज्यसभेसाठी माजी खासदार गजानन कीर्तिकर, आनंद अडसूळ आणि राहुल शेवाळे यांसारखे दिग्गज नेते इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी अनपेक्षित उमेदवार दिला गेल्याने हे नेते, विशेषतः राहुल शेवाळे तीव्र नाराज होते. गेल्या आठवडाभरापासून ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मंत्री उदय सामंत यांच्याकडून सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री सामंत हे शेवाळेंना घेऊन दिल्लीला रवाना झाले. तिथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत शेवाळेंना केंद्रातील महत्त्वाच्या जबाबदारीचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही, याचा फटका शेवाळेंना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महापालिका निवडणुकीची सर्व धुरा शेवाळे यांच्यावर होती. उबाठा गटातील अनेक माजी नगरसेवक सोबत आल्याने ५० ते ६० नगरसेवक निवडून येतील असा कयास बांधला जात होता. मात्र, अपेक्षित निकाल न लागल्यानेच शेवाळे यांची राज्यसभेची उमेदवारी कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.



कोणती जबाबदारी मिळणार?


दरम्यान, दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, "पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल," अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या शेवाळे यांच्याकडे आता दिल्लीतील कोणती संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाते आणि त्यानंतर त्यांची नाराजी खरोखर दूर होते का, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार

Nitesh Rane : चामोर्शीत उभे राहणार आधुनिक मत्स्य प्रशिक्षण केंद्र; गडचिरोलीतील मच्छीमारांना मिळणार नवी दिशा

- प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कार्यवाहीला गती देण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : गडचिरोली

Chief Minister's Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९५ रुग्णांना १५.७३ कोटींची मदत

मुंबई : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर