आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडमधील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या ३२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेवर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील जालना रोडच्या काझीनगर भागात ही घटना घडली. बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे विजयी उमेदवार अशोक काळे नगरसेवक म्हणून विजयी झाले. वडीलांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर काळे यांच्या ३२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. पवन अशोक काळे असे या तरुणाचे नाव असून वयाच्या ३२व्या वर्षी त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे.


पवन काळे यांनी बीड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, पवन काळेने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचचले? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.




बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये पवनचे वडील अशोक काळे २१ डिसेंबरला लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालात विजयी झाले होते. निवडणुकीच्या दरम्यान पवन वडिलांच्या विजयासाठी प्रचारात सक्रिय होता. निकालानंतर अशोक काळे विजयी झाल्यानंतर सगळ्यांनीच जल्लोष केला होता. यावेळी विजयी मिरवणुकीत पवन सुद्धा सामील होता. मात्र नगर परिषदेतील विजयामुळे घरात आनंदाचं वातावरण असताना पण अचानक पवनने टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या