मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती, अशा २ हजार ९९४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाचा बोनस थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त होत असल्याची माहिती खरेदी-विक्री संघाचे प्रशासकीय चेअरमन संतोष पवार यांनी दिली. या योजनेअंतर्गत तालुक्यातील एकूण २ हजार ९९४ शेतकऱ्यांच्या खात्यात ७ कोटी २६ लाख ९६हजार १९८ इतकी मोठी बोनस रक्कम जमा होणार आहे. ऐन हंगामात ही हक्काची रक्कम मिळाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार किसन कथोरे यांनी शेतकऱ्यांच्या या प्रलंबित बोनससाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या या कार्याबद्दल चेअरमन संतोष पवार आणि सर्व प्रशासकीय संचालक मंडळाने आमदारांचे जाहीर आभार मानले आहेत. "आमदार किसन कथोरे साहेब हे सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहतात, त्यामुळेच आज शेतकऱ्यांना हा लाभ मिळत आहे," असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.


लवकरच नवीन भात खरेदी केंद्र सुरू होणार


बोनस वितरणासोबतच, खरेदी-विक्री संघाकडून या वर्षाची नवीन भात खरेदी प्रक्रिया देखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या

दुर्दैवी! वाढदिवशी चिमुकली स्वत:लाच घेऊ लागली चावा,५ वर्षीय निशाचा करुण अंत

दिवा : दिवा येथे घराबाहेर खेळताना कुत्रा चावलेल्या पाच वर्षांच्या बालिकेची महिनाभर सुरु असलेली मृत्यूशी झुंज