दिंडोशीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते बंद, भाजपा आणि शिवसेना किती जागा वाढवणार


मुंबई (सचिन धानजी) : दिंडोशी विधानसभा मतदार संघातून उबाठाचे सुनील प्रभू हे सन २०१४पासून सलग निवडून येत असले तरी या प्रभागातून उबाठाला सर्वच जागा राखता आलेल्या नाही. या प्रभागातून सन २०१७ मध्ये यशिवसेनेचे ४ नगरसेवक निवडून आले असले तरी त्यातील उबाठाकडे केवळ २ नगरसेवक राहिले आहे. त्यामुळे सुनील प्रभू आता या प्रभागातून किती नगरसेवक निवडून आणतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दिंडोशीमध्ये भाजपा आणि शिवसेना किती जागा मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.


दिंडोशी विधानसभा मतदार संघात एकूण ७ नगरसेवकांचे प्रभाग असून त्यात भाजपाचे दोन आणि उबाठाचे दोन माजी नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे तीन नगरसेवक आहे. त्यामुळे या प्रभागात एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते उघडले होते, तेही बंद झाल्याने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस याठिकाणी आपले खाते उघडणार का की राष्ट्रवादी काँग्रेसला यापासून भाजपा आणि शिवसेना रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.



लोकसभा निवडणुकीत दिंडोशी विधानसभेतील मतदान


रवींद्र वायकर, शिवसेना : ७२,११८


अमोल किर्तीकर, उबाठा : ७७,४६९


दिंडोशी विधानसभा निकाल


सुनील प्रभू, उबाठा : ७६,४३७


संजय निरुपम, शिवसेना : ७०,२५५





  • प्रभाग क्रमांक ३७ (महिला)


हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण महिलाकरता राखीव होता आणि पुन्हा एकदा सर्वसाधारण महिलाकरता राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून आलेल्या प्रतिभा शिंदे यांना भाजपाच्यावतीने पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाकडून प्रतिभा शिंदे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर उबाठाकडून पुजा चौहान यांच्या नावाची चर्चा आहे, तर मनसेकडून ठसाळे यांच्याही नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागात भाजपा विरुध्द उबाठा अशीच लढत पहायला मिळणार आहे.





  • प्रभाग क्रमांक ३८ (महिला)


हा प्रभाग ओबीसी असल्याने यापूर्वी शिवसेनेचे आत्माराम चाचे हे निवडून आले होते. परंतु आता हा प्रभाग महिला राखीव झाला आहे. त्यामुळे चाचे यांना घरी बसावे लागणार आहे. मात्र, हा प्रभाग शिवसेनेकडे असल्याने चाचे हे आपल्याला सुनेला निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहेत. तर या जागेवर मनसेने दावा केला असून मनसेचे विधानसभेचे उमेदवार असलेले भास्कर परब यांनी आपली बहिण सुरेखा परब यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केला आहे. तर उबाठामधून प्रदीप निकम हे आपल्या सुनेसाठी तर गावडे हे आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशीर आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये हा प्रभाग मनसेला जाण्याची शक्यता असल्याने शिवसेना विरुध्द मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे.





  • प्रभाग ३९ (महिला)


हा प्रभाग यापूर्वी महिला आरक्षित होता आणि पुन्हा एकदा महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेविका विनया विष्णू सावंत यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विष्णू सावंत यांचे या प्रभागात प्रस्थ आहे. विष्णू सावंत आणि विनया सावंत शिवसेनेत गेल्यामुळे उबाठातून पुष्पा रमेश कळंबे यांच्या नावाची चर्चा आहे.





  • प्रभाग क्रमांक ४० (सर्वसाधारण)


हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव होता आणि याप्रभागातून माजी उपमहापौर ऍड सुहास वाडकर हे निवडून आले होते. हा प्रभाग पुन्हा एकदा सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव झाला आहे. मात्र, या प्रभागातून ऍड सुहास वाडकर यांच्या ऐवजी माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. या प्रभागातून समझोत्याने वाडकर यांच्याएेवजी शिंदे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर या प्रभागातून शिवसेनेकडून सुदाम आव्हाड, संजय परब, प्रथमेश पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.





  • प्रभाग क्रमांक ४१(ओबीसी)


हा प्रभाग यापूर्वी सर्वसामान्य प्रवर्गाकरता राखीव झाला होता. या प्रभागातून शिवसेनेकडून माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने तुळशीराम शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यामुळे तब्बल २३४८ मतांनी शिवसेनेच्या उमेदवार सदाशिव पाटील यांचा पराभव करत तुळशीराम शिंदे विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता हा प्रभाग ओबीसी झाल्यामुळे तुळशीराम शिंदे यांनी प्रभाग ४०मध्ये मोर्चा वळवला आहे, तर प्रभाग ४०चे माजी नगरसेवक ऍड सुहास वाडकर हे या प्रभागातून उबाठाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर या प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावाची चर्चा ऐकायला येत नाही. परंतु काँग्रेसच्यावतीने चव्हाण तर,राम यादव हे आपल्या मुलासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.





  • प्रभाग क्रमांक ४२


हा प्रभाग ओबीसी महिलाकरता राखीव होता. याप्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनश्री भरडकर या निवडून आल्या होत्या. भरडकर या आता शिवसेनेत गेल्यामुळे शिवसेनेच्यावतीने पुन्हा धनश्री भरडकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर या प्रभागातून उबाठाच्यावतीने माजी नगरसेविका रिना सुर्वे किंवा माजी नगरसेवक प्रशांत कदम यांची पत्नी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर भाजपाकडून भारती बेंडे यांच्याही नावाची चर्चा आहे



प्रभाग क्रमांक ४३ (सर्वसाधारण)


हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण अर्थात खुला होता आणि भाजपचे विनोद मिश्रा हे निवडून आले होते. भाजपाचे महापालिका पक्षनेते असलेल्या विनोद मिश्रा यांचा आरक्षणात प्रभाग कायम राहिल्याने पुन्हा एकदा त्यांच्यावर शिक्कामोर्तब होत आहे. तर उबाठाकडून समृध्द शिर्के यांच्या नावाची चर्चा आहे.या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडून मागणी होवू शकते आणि या प्रभागातून या पक्षाचे अजित रावराणे यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे या प्रभागात भाजपा विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्यात लढा होवू शकतो.

Comments
Add Comment

Gold Silver Rate: सलग चौथ्यांदा सोने चांदी पुन्हा नव्या उच्चांकावर, चांदी एक सत्रात प्रति किलो १०००० रूपयांनी महाग

मोहित सोमण: जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा फटका म्हणून सलग चौथ्यांदा सोनेचांदीत तुफान वाढ झाली आहे. सोन्याचांदीने

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

पुण्यात मोठा भाऊ कोण? एकच चिन्ह, एकत्र लढत, ठाकरे-मनसे जागावाटपावर वसंत मोरेंचं स्पष्ट मत

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

टाटा मोटर्सकडून ईव्ही गाड्यांची विक्रमी विक्री,संपूर्ण ईव्ही बाजारातील ६६% बाजार हिस्सा कंपनीकडून कॅप्चर

तब्बल २५०००० ईव्ही विक्रीचा टप्पा पार मुंबई: टाटा मोटर्सने मोठ्या प्रमाणात बी कॉर्पोरेट रिकस्ट्रक्चरिंग