नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसरात घरगुती वादातून झालेल्या गोळीबारात एका प्राध्यापकासह तिघे जण जखमी झाले आहेत. या घटनेत एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. गुमगावमधील गज्जू नावाच्या व्यक्तीचा देवतळे कुटुंबाशी अनेक दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. या वादातूनच रागाच्या भरात आरोपीने थेट बंदूक काढत गोळीबार केला.


या हल्ल्यात प्राध्यापक नितीन देवतळे, प्रविण देवतळे तसेच त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गोळी लागून जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने दोन राऊंड फायरिंग केल्याचे समोर आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


भरदिवसा आणि वस्ती असलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गुमगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, तसेच त्याच्याकडे शस्त्र कसे आले, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह

Pandharpur Temple | मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंदिरात भाविकांसाठी विशेष नियोजन; १३ व १४ जानेवारीला दर्शन वेळापत्रकात बदल

पंढरपूर : मकरसंक्रांती आणि भोगी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात

पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा निर्णय; 'हे' दोन दिवस प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ ६०० बस शिल्लक

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदान प्रकिया सुरुळीत पर पाडण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाचा मोठा

काळाने घातला घाला ; पंढरपुरातील अहिल्या पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरचा भीषण अपघात

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर रविवारी रात्री एक हृदयपिळवणारा

Pune News :पुण्यातील रस्ते केले साफ,पुण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा.. नक्की काय होणार ?

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था हा नेहमीच नागरिकांसाठी कळीचा मुद्दा राहिला आहे.पण पुण्यातील