कांदिवली पूर्व विधानसभा पुढेही उबाठा आणि काँग्रेसमुक्त दिसणार?

िचत्र पालिकेचे कांदिवली िवधानसभा

सचिन धानजी मुंबई :
कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात नगरसेवक पदाचे आठ प्रभाग असून या प्रभागात एकमेव उबाठाचे नगरसेवक होते तेही शिवसेनेत आल्यामुळे या विधानसभेत उबाठाचे खाते शून्यावर आले आहे. त्यामुळे या विधानसभेत उबाठाचा एकही नगसेवक नाही. मात्र, आठपैंकी भाजपचे सात नगरसेवक असून कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ हा आता उबाठा आणि काँग्रेसमुक्त करण्यात यश आले आहे. येत्या निवडणुकीनंतर हे आता खऱ्याअर्थाने उबाठा आणि काँग्रेसमुक्त करण्यावर भाजपसह शिवसेना महायुतीचा प्रयत्न असेल.
कांदिवली पूर्व विधानसभेत एकूण आठ नगरसेवक प्रभाग आहेत आणि त्यातील सात नगरसेवक हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. प्रभाग क्रमांक २८ मधून काँग्रेसच्या तिकिटावर राजपती यादव हे विजयी झाले होते; परंतु जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये राजपती यादव यांचे अवैध ठरल्याने त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाले आणि या प्रभागातून शिवसेनेचे एकनाथ हुंडारे यांची नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
हुंडारे आता शिवसेनेत असून उबाठाचे खाते रिकामी झाले आहे. या विधानसभेतून काँग्रेस आणि उबाठाचा एकही नगरसेवक नसून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संघटनात्मक बांधणी करत या विधानसभेतून उबाठा आणि काँग्रेसला खऱ्या अर्थाने हद्दपार केले का याचे उत्तर येणाऱ्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.


लोकसभा निवडणुकीतील कांदिवली पूर्व विधानसभेतील मतदान
 




  1. पियुष गोयल, भाजप : १,०८,५३६

  2. राभूषण पाटील, काँग्रेस : ३८,६३१


कांदिवली विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल
 




  1. अतुल भातखळकर, भाजप : १, १४,२०३

  2. कालू बुंढेलिया, काँग्रेस : ३०,६१०



  •  प्रभाग क्रमांक २३ (सर्वसाधारण)
    हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण अर्थात खुला होता. या प्रभागातून भाजपचे शिव कुमार झा हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. आता हा प्रभाग पुन्हा एकदा सर्वसधारण झाला आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने पुन्हा एकदा शिवकुमार झा यांचे नाव चर्चेत आहे. तसेच या प्रभागातून पक्षाच्यावतीने नवीन युवा चेहराही देण्याची शक्यता आहे, तर या प्रभागातून राणा शिवसहाय सिंह हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे, तर काँग्रेसकडून आर. पी. आणि राघवेंद्र मिश्रा यांच्याही नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे.

  • प्रभाग क्रमांक २४ (महिला)
    हा प्रभाग यापूर्वी महिला आरक्षित होता आणि पुन्हा एकदा महिला राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या सुनीता यादव यांच्यासाठी या प्रभागातून हिरवा दिवा मिळण्याची शक्यता आहे. या प्रभागातून भाजपच्या सुनीता यादव यांच्यासमोर उमेदवारीसाठी आव्हान असेल ते राणी निघोट आणि स्वाती जयस्वाल यांचे. या प्रभागातून यादव यांच्यासह या दोन्ही उमेदवारांची इच्छुक म्हणून चर्चा आहे. काँग्रेसकडून खुराणा यांच्या नावाची चर्चा आहे.

  • प्रभाग क्रमांक २७( ओबीसी महिला)
    हा प्रभाग पूर्वी ओबीसी महिलाकरिता राखीव होता आणि पुन्हा एकदा ओबीसी महिला करिता राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील यांना आरक्षणात तरी प्रभाग कायम राखता आला. त्यामुळे भाजपकडून पुन्हा सुरेखा पाटील यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, या प्रभागातून भाजपच्यावतीने सोनम गुरव आणि निलम साळुंखे यांचीही नावे इच्छुकांच्या यादीत आहेत, तर उबाठाकडून इच्छुकाचे नाव पुढे येत नसले तरी काँग्रेसकडून मागील निवडणूक लढणाऱ्या प्रियंका यादव किंवा अन्य कुणी याची चाचपणी सुरु आहे.

  • प्रभाग क्रमांक २८(महिला)
    हा प्रभाग ओबीसीकरिता राखीव होता. त्यामुळे या मतदार संघातून काँग्रेस राजपती यादव हे निवडून आले होते; परंतु जातप्रमाणपत्र पडताळीत यादव यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार एकनाथ हुंडारे यांना विजयी घोषित करण्यात आली. तब्बल साडेतीन हजारांपेक्षाही मताधिक्य मिळवून यादव बाद झाले आणि साडेचार हजार मतदान घेणारे हुंडारे विजयी झाले. हा प्रभाग आता महिला राखीव झाल्याने शिवसेनेचे एकनाथ हुंडारे यांनी आपली कन्या उरशाली यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केला आहे, तर उबाठामधून प्रशांत कोमणे हे आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसकडून माजी नगरसेविका अजंता यादव या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

  •  प्रभाग क्रमांक २९(सर्वसाधारण)
    हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण असल्याने भाजपचे सागरसिंह ठाकूर हे निवडून आले होते; परंतु हा प्रभाग पुन्हा एकदा सर्वसाधारण म्हणजे खुला झाला आहे. त्यामुळे भाजपाचे सागरसिंह ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याचा मार्ग खुला आहे. उबाठाकडून सचिन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे, तर काँग्रेसचा जुना प्रभाग असला तरी याठिकाणी काँग्रेसच्या इच्छुकाचे नाव
    चर्चेत नाही.

  • प्रभाग क्रमांक ३७ (सर्वसाधारण)
    हा प्रभाग यापूर्वी महिला आरक्षित असल्याने भाजपच्या दक्षा पटेल या निवडून आल्या होत्या. पण हा प्रभाग आता सर्वसाधारण अर्थात खुला झाला आहे. त्यामुळे भाजपच्यावतीने विद्यमान दक्षा पटेल यांचे नाव इच्छुकाच्या यादीत प्रथम आहे. मात्र, याच प्रभागातून सिध्दार्थ शर्मा आणि विजय भोसले यांचीही नावे चर्चेत आहे, तर उबाठाकडून धनावडे यांचेही नाव चर्चेत आहे.

  • प्रभाग क्रमांक ४४ (महिला)
    हा प्रभाग पुन्हा एकदा महिला राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून भाजपच्यावतीने यापूर्वी निवडून आलेल्या संगीता शर्मा यांचे नाव पुढे आहे; परंतु प्रभाग आरक्षणाचा विचार झाल्यास संगीता शर्मा यांना अन्य प्रभागातून पुनर्वसन केले जावू शकते असेही बोलले जात आहे. या प्रभागातून उबाठा आणि काँग्रेसच्या इच्छुकाचे नाव चर्चेत दिसून येत नाही.

  • प्रभाग क्रमांक ४५ (ओबीसी)
    हा प्रभाग ओबीसी राखीव होता आणि पुन्हा एकदा ओबीसी राखीव झाला आहे. या प्रभागातून यापूर्वी भाजपाचे राम बारोट हे विजयी झाले होते. त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रभागातून नवीन चेहऱ्याला संधी देतात की, आजुबाजूच्या माजी नगरसेवकाचे पुनर्वसन होणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. हा प्रभाग भाजपला अनुकूल असल्याने भाजपकडून ओबीसी उमेदवारांच्या उड्या पडत आहे, तर काँग्रेस आणि उबाठाकडून इच्छुक उमेदवारांची नावे अद्याप पुढे आलेली नाहीत.

Comments
Add Comment

पवार कुटुंबाला दिलासा; लवासा प्रकरणी दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पातील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ

Maharashtra Municipal Elections 2026 : महापालिका रणसंग्रामाला आजपासून प्रारंभ; २९ शहरांत अर्ज भरण्याची लगबग, राजकीय समीकरणांचा पेच कायम

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेचा महासंग्राम आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुंबईसह

भाजपची मुंबईतील बूटपॉलिशवाल्यांनाही साद

महापालिका निवडणूक प्रचाराचे अभिनव ‘फंडे’ मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकाच नव्हे, तर

मुंबई महापालिका रुग्णालयांत आता ‘सूक्ष्मजंतुनाशक’ बेड मॅट

जंतुसंसर्ग रोखण्यासाठी पालिका सज्ज मुंबई : मुंबईतील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांना होणारा

इच्छुक उमेदवारांची कागदपत्रे जमवण्यासाठी धावपळ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता मंगळवारी (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार

वांद्रे पूर्व स्कायवॉकचा खर्च १७ कोटींनी वाढला

जलवाहिनी आणि पर्जन्य जलवाहिनींमुळे खर्चात वाढ एका सरकत्या जिन्याचे बांधकाम केले रद्द मुंबई : वांद्रे पूर्व