Taj Hotel In Kokan : कोकणात 'ताज'चं आगमन! सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा मार्ग मोकळा

ताज ग्रुपच्या आलिशान प्रकल्पाला 'ग्रीन सिग्नल'


सिंधुदुर्ग : निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला जाणार आहे. शिरोडा-वेळाघर येथे अनेक वर्षांपासून रखडलेल्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड (ताज ग्रुप) च्या पहिल्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रकल्पातील अडथळे दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे सिंधुदुर्गात जागतिक दर्जाच्या पर्यटनाची कवाडं खुली होणार आहेत.



शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताला प्राधान्य


मुंबईतील 'मेघदूत' निवासस्थानी झालेल्या या बैठकीत ५२.६३ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनावर सखोल चर्चा करण्यात आली. जमिनीचा मोबदला आणि वाढीव कालावधीमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने विशेष पॅकेजला तत्त्वतः मान्यता दिली आहे. "प्रकल्पग्रस्तांना दोन टप्प्यात तातडीने मोबदला द्या," असे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत.



त्रिपक्षीय करार आणि रोजगाराची हमी


या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये होणारा 'त्रिपक्षीय करार'. स्थानिक ग्रामस्थ, ताज ग्रुप आणि पर्यटन विभाग यांच्यात हा करार होणार असून, याद्वारे स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासोबतच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे. या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नितेश राणे यांनी शंभूराज देसाई यांचे आभार मानताना म्हटले की, "देसाईंच्या पुढाकारामुळेच अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प पुन्हा मार्गी लागला आहे." तर दीपक केसरकर यांनी स्थानिक नागरिकांनी जिल्ह्याच्या हितासाठी या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.



जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलणार?


हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाचे केंद्र बनेल. उच्चभ्रू पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक हॉटेल व्यावसायिक, वाहतूकदार आणि छोट्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

Comments
Add Comment

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या व्हिडिओने लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांना मागे टाकत केला ग्लोबल रेकॉर्ड : आतली संपूर्ण माहिती

मुंबई : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे लग्न हे केवळ एक सेलिब्रिटी सेलिब्रेशन राहिले नाही, तर ते २०२६

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

Pune Crime : महाविद्यालयाबाहेर तरुणाचे अश्लील कृत्य; २२ वर्षीय युवक ताब्यात

पुणे : शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनींकडे अश्लील हावभाव करत

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी