रोजगार निर्मितीतच नव्हे तर नव्या अर्जदारांसह महिला अर्जदारांची संख्या तुफान वाढली- अहवाल

मुंबई: एक प्रसिद्ध झालेल्या अहवालातील माहितीनुसार, सेवेवर आधारित नोकरभरतीचा विस्तार झाल्याने तसेच महिलांसह सुरुवातीच्या कारकीर्दीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांमध्ये वाढ झाल्याने २०२५ मध्ये नोकरीच्या अर्जात इयर ऑन इयर बेसिसवर २९% वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षी अर्जादारांची संख्या तब्बल ९ कोटींवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये महिलांनी ३.८ कोटींहून अधिक नोकरीसाठी अर्ज केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत अंदाजे ३% वाढले. 'इंडिया ॲट वर्क २०२५' अहवालानुसार, २०२५ हे वर्ष भारतातील नोकरीच्या बाजारपेठेसाठी एक प्रगतीशील वर्ष होते.


वाढलेल्या महिला अर्जदारांमध्ये सर्वाधिक वाढ अँडमिन, कस्टमर एक्सपिरिंयस, हेल्थकेअर, ग्राहक कंज्यूमर ड्युरेबल्स, फायनान्स इत्यादी क्षेत्रात नोंदवली गेली आहे. तसेच अहवालातील निरीक्षणातील माहितीनुसार, इयर ऑन इयर बेसिसवर बीएसएसआय (Banking and Financial Services Insurance) क्षेत्रासह ई कॉमर्स, लॉजिस्टिक्स, रिटेल क्षेत्रात सर्वाधिक नोकरीच्या संधी निर्माण झाल्या ज्यामध्ये सर्वाधिक अर्ज नव्या अर्जदाराचे आल्याचे माहिती अहवालाने दिली आहे. संबंधित क्षेत्रातील महिलांच्या अर्जात इयर बेसिसवर ३६% वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अपना.को (Apna.co) या व्यासपीठाने संबंधित सर्वेक्षण केले आहे. दरवर्षी अहवालानुसार १ कोटी नवे अर्जदार नोकरीसाठी अर्ज दाखल करत आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्रातील नोकरीच्या अर्जात वाढल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले. आकडेवारीनुसार, १०% वाढ संबंधित तंत्रज्ञान आधारित क्षेत्रात झाली आहे. अपना.को ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, एकूण १४ लाख अर्ज कंपनीच्या व्यासपीठावर (Platform) प्रसिद्ध केले असल्याचेही कंपनीने म्हटले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५% आहे असे कंपनीने म्हटले.


एकीकडे तंत्रज्ञानात वाढ होत असताना नोकरीच्या निर्मितीत झालेल्या वाढीमुळे नव्या संधी निर्माण होत आहे. नोकरीच्या संधी उपलब्ध असताना वाढलेल्या तांत्रिक व्यासपीठांमुळे टिअर २,३ मधील अर्जदारांना नोकरी मिळण्यास आणखी मदत होत आहे. मुख्य प्रवाहातील कंपन्या व्यतिरिक्त लघु आणि मध्यम उद्योगांनी १० लाख नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत ज्यात इयर ऑन इयर बेसिसवर ११% वाढ नोंदवली आहे. अहवालानुसार मोठ्या उद्योगांनी ४ लाख संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यात इयर बेसिसवर १४% वाढ झाली. अहवालातील दाव्यानुसार, ज्यामुळे भौगोलिकदृष्ट्या अधिक वितरित भरती प्रक्रियेला बळकटी मिळाली.


टियर १ शहरांमधून अंदाजे २ कोटी अर्ज आले असून तर टियर २ आणि ३ शहरांमधून सुमारे १.८ कोटी अर्ज आले आहेत. अर्जदारात उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये जवळपास ३०% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. अहवालातील निरिक्षणातील माहितीनुसार, महिलांच्या सरासरी पगारात अंदाजे २२% वाढ झाली. त्यामुळेच महिलांचा सहभाग व नेतृत्व फळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते.


हा अहवाल २०२५ या कॅलेंडर वर्षासाठी Apna.co प्लॅटफॉर्मवरील डेटाच्या वार्षिक विश्लेषणाच्या विस्तृत संशोधनावर आधारित आहे. अहवालातील दाव्यानुसार,लहान आणि मध्यम व्यवसायांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब आणि मोठ्या उद्योगांचा टियर २ आणि ३ शहरांमध्ये विस्तार सुरू राहिल्यामुळे, Apna.co व्यासपीठावरील नोकरीच्या जागांची संख्या २०२५ मध्ये १४ लाखांपर्यंत वाढली, जी इयर ऑन इयर बेसिसवर १५% वाढली आहे. लहान आणि मध्यम व्यवसायांनी १० लाख नोकरीच्या जागा उपलब्ध केल्या गेल्या ज्या इयर ऑन इयर बेसिसवर ११% वाढल्या मोठ्या उद्योगांनी ४ लाख जागा उपलब्ध केल्या असून ज्यात इयर बेसिसवर १४% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

चंद्रपुरातील शेतकऱ्याची किडनी विकणाऱ्या डॉक्टरला अटक

चंद्रपूर : कर्जबाजारी शेतकऱ्याची किडनी विकल्याच्या गाजलेल्या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

लाडकी काव्या म्हणजेच ज्ञानदाची लगीनघाई सुरु; हातावर रंगली त्याच्या नावाची मेहंदी

मुंबई : लग्नाचा हंगाम जोरदार सुरु आहे. बरेच सेलिब्रिटी मंडळी या वर्षी विवाह बंधनात अडकली तर काही लवकरच लग्न करणार

पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभास यांनी ‘द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’द्वारे जागतिक स्टोरीटेलिंगला दिले नवे व्यासपीठ!

बाहुबली, सालार आणि कल्कि 2898 ए.डी. सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे आणि ज्यांना अनेकदा जगातील महान

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

कांतारा चॅप्टर १’ ला तगडी टक्कर देत, ‘धुरंधर’ बनला २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

रणवीर सिंग स्टार "धुरंधर" या चित्रपटाने आपली कमाई सुरूच ठेवली आहे.चित्रपटाने १७ दिवसांत ५५५ कोटींचा आकडा ओलांडला

२०२५ मध्ये जनरेशन झेडने आणला पर्यटनाचा नवा ट्रेंड

प्रवास बुकिंगमध्ये वाढ; क्लीअरट्रिपचा वर्षअखेरीचा अहवाल नवी दिल्ली : २०२५ मध्ये भारतीयांच्या प्रवासाच्या सवयी