एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक


नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी दक्षिण मुंबईतील कामा रुग्णालयात अतिरेकी आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली होती. या चकमकीचे नेतृत्व करणारे राज्याच्या अतिरेकी विरोधी विभागाचे अर्थात अँटी टेररिस्ट स्क्वाडचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख आणि आताचे एनआयएचे (राष्ट्रीय तपास संस्था / नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) प्रमुख सदानंद दाते हे १ जानेवारी २०२६ पासून राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सूत्र हाती घेणार आहेत. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या चर्चेअंती हा निर्णय झाला आहे. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने एनआयए प्रमुख असलेले भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस / इंडियन पोलीस सर्व्हिस) १९९० च्या बॅचचे अधिकारी दाते यांना महाराष्ट्र कॅडरमध्ये परत पाठवण्यास मंजुरी दिली आहे.


सदानंद दाते १ एप्रिल २०२४ पासून एनआयएचे नेतृत्व करत आहेत. ते १ जानेवारी २०२६ पासून राज्याच्या पोलीस महासंचालक या पदाची सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. राज्याच्या सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांना आधीच मुदतवाढ देऊन अतिरिक्त कार्यकाळासाठी महासंचालक पदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी रश्मी शुक्ला निवृत्त झाल्यानंतर राज्याच्या पोलीस दलाचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला होता. पण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सहमती झाल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे.


सदानंद दाते यांनी आधी महाराष्ट्र एटीएस प्रमुख, मुंबई सहपोलीस आयुक्त (गुन्हे), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), कायदा व न्या विभागाचे संयुक्त सचिव अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे हाताळल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या फोर्स वन या कमांडो पथकाचेही नेतृत्व केले आहे.


काही वर्षांपूर्वी बिहारच्या राहुल राजने मुंबईत प्रवाशांसह बेस्ट बसचे अपहरण केले होते. राज ठाकरेंना ठार मारायचे आहे त्यांच्या घरी बस घेऊन चला असे म्हणत या तरुणाने दहशत निर्माण केली होती. अखेर सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चतुराईने परिस्थिती हाताळत सदानंद दाते यांनी राहुल राजला चकमकीत ठार केले होते. दातेंनी २६/११ च्या वेळी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली होती. त्यावेळी चकमकीत जखमी झालेल्या दातेंना नंतर राष्ट्रपतींनी शौर्य पदकाने गौरविले होते.


दातेंनी हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत मिनेसोटा विद्यापीठातून व्हाईट-कॉलर आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी उच्च शिक्षण घेतले होते. जर्मन फेडरल पोलिसांच्या विशेष युनिट GSG-9 (Grenzschutzgruppe-9) सोबतही त्यांचे विशेष प्रशिक्षण झाले आहे.


Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,