काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश व्यास यांनी मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. धर्मेश व्यास हे माजी नगरसेवक असून काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान पदाधिकारी होते. काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या फळीतील हे पदाधिकारी होते.


धर्मेश व्यास हे सांताक्रुज पूर्व येथील प्रभात कॉलनी, आनंद नगर परिसरातील प्रभाग क्रमांक ८१ मधून २००७ ते २०१२ या कालावधी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तर त्याआधीच्या कालावधीत ते नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र बाद झाल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली होती. धर्मेश व्यास वकील असून अनेकदा काँग्रेसची कायदेशीर बाबी त्यांनी हाताळल्या आहेत.


गुरुदास कामत यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू असलेले समीर देसाई यांनी प्रथम भाजपा आणि नंतर उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. तर राजहंस सिंह यांनी भाजपात याआधीच प्रवेश करत ते भाजपावासी झाले आहेत. त्यानंतर आता धर्मेश व्यास यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. तर शिवजी सिंह आणि अमरजित सिंह मनहास हे अजूनही काँग्रेसमध्ये राहिले आहेत. व्यास यांच्या पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपा नेते प्रवीण दरेकर, भाजपाचे नेते मधु चव्हाण, माजी नगरसेवक महेश पारकर, आदी उपस्थित होते. पक्ष प्रवेश केल्यानंतर व्यास यांनी भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि मंत्री ॲड आशिष शेलार यांची भेट घेतली. यावर्षी शेलार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मिठी नदीतील गॅस साठा म्हणजे 'भ्रष्टाचाराचा कचरा'; रितू तावडे यांचा 'पेंग्विन सेने'वर घणाघाती प्रहार!

मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे

गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारची नियमावली

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य; साठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई : इराण आणि इस्राईल दरम्यान

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

मुंबई : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय

१ एप्रिलपासून मर्सिडीज-बेंझच्या कार किमतीत २ टक्क्यांची होणार वाढ

मुंबई : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारातील ग्राहकांसाठी एक

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Borivali National Park Toy Train : वनराणी इज बॅक! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा धावणार!

मुंबई : बोरिवलीच्या निसर्गरम्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा एकदा पर्यटकांच्या