ज्युपिटर वॅगन्सचा शेअर इंट्राडे २०% का उसळला? 'हे' आहे कारण

मोहित सोमण: रेल्वे उत्पादनाशी संबंधित मोबिलिटी सोलूशन व अँक्सेसरीज कंपनी असलेल्या ज्युपिटर वॅगन्स (Jupiter Wagons) कंपनीचा शेअर आज जबरदस्त पातळीवर उसळला आहे. आज कंपनीचा शेअर २०% इंट्राडे उच्चांकावर (All time High) बंद झाल्याने प्रति शेअर किंमत ३१२.३० रूपयावर बंद झाली आहे. कंपनीच्या प्रवर्तक असलेल्या त्रत्ररवगोअंका (Tatravagnka) यांनी ओपन मार्केट ऑपरेशनमधून २८६२३४० इक्विटी शेअर्सची खरेदी केल्याने शेअर उसळले. प्रामुख्याने प्रवर्तकांचे कंपनीमधील होल्डिंग्स वाढल्याने गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअरला सकारात्मक कौल दिला आहे. सेबी पीआयटी (Prohibition of Insider Trading) रेग्युलेशन २०१५ नुसार कंपनीने ही घडामोड घोषित केल्यानंतर शेअर आणखी उसळला.


माहितीप्रमाणे ४७० रुपये प्रति शेअर या सौद्याने हे शेअर खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रवर्तकांचे भागभांडवल १८.६९% वरुन १९.२४% वर वाढले आहे. प्रेफरन्सशियल इशू (Preferential Issue Allotment) अंतर्गत हा व्यवहार झाल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअरमध्ये ११% ची वाढ झाली असून एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये २% ची वाढ झाली तर २०२५ च्या सुरुवातीपासून त्यात २१.३% ची घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १२४२९.३० कोटी रुपये आहे.


सप्टेंबर तिमाहीसाठी, या रेल्वे कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या ९० कोटींवर घसरण ४६.६ कोटीवर पोहोचला होता. तिमाहीतील कंपनीचा महसूल देखील इयर ऑन इयर बेसिसवर २२% ने घसरून १००९ कोटींवरून ७८६ कोटी झाला होता. कंपनीचा ईबीटा (करपूर्व कमाई EBITDA) १४० कोटींवरून १०४ कोटींवर घसरली असून ज्यात २५.६% ची घट नोंदवली गेली. मार्जिनमध्ये इयर बेसिसवर ६० बेसिस पॉइंट्सने कमी होऊन १३.८% वरून १३.२% झाले आहे.


हा स्टॉक त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ४५% पेक्षा कमी किमतीवर व्यवहार करत आहे. ही उच्चांकी पातळी ५४८.५० होती. २० डिसेंबर २०२४ रोजी शेअरने नवा उच्चांक गाठला होता. गाठली गेली होती. एक्सचेंजमधील माहितीनुसार, एका वर्षातील कंपनीच्या शेअरची नीचांकी पातळी २४७.१५ रूपये प्रति शेअर होती. ९ डिसेंबरला ही घसरण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेअरने रिकव्हरी केली आहे. गेल्या ५ दिवसात शेअर १८.४७% उसळला असून गेल्या महिनाभरात शेअर ८.८३% उसळला. मात्र इयर टू डेट (YTD) बेसिसवर कंपनीचा शेअर ३८.४१% घसरला.

Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत