सिंधुदुर्ग : आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक आणि सूचक पोस्ट शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राणे कुटुंबीयांना आणि त्यांच्या नेतृत्वाला लक्ष्य केले जात असताना, नितेश राणे यांनी आता "गप्प बसण्याची वेळ संपली आहे," असं म्हंटल आहे.
संतोष राऊळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांचे वर्चस्व सिद्ध झाले. सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण आणि ...
पक्षासाठी आणि कुटुंबासाठी राखले होते मौन...
नितेश राणे यांनी आपल्या X पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले की, "आतापर्यंत मी केवळ पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो. काही मर्यादा पाळत होतो." मात्र, आपल्या शांततेचा गैरफायदा घेऊन चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "काही गोष्टी बोलल्या नाही तर त्या खऱ्या वाटायला लागतात," असे म्हणत त्यांनी सत्याविरुद्ध आता आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोणावर होणार पलटवार?
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही, मात्र त्यांचा रोख महाविकास आघाडीतील नेत्यांकडे असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः कोकणचे राजकारण आणि मुंबईतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे कुटुंबावर होणाऱ्या टीकेला आता ते सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. या ट्विटनंतर नितेश राणे लवकरच एखादी पत्रकार परिषद घेऊन मोठे खुलासे करणार का? किंवा कोणत्या प्रकरणावर भाष्य करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. "पण आता ती वेळ आली आहे!" या त्यांच्या वाक्यामुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, राणे नेमका कोणता बॉम्ब फोडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.