मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर अधिक सुरक्षा रक्षक नेमणार - मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ८९५ उद्याने आणि मनोरंजन उद्याने अस्तित्वात आहेत. या उद्यानांसह शहरातील मोकळ्या जागांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.


विधानसभा सदस्य दिलीप लांडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अबू आझमी, अमित साटम, मुरजी पटेल, अनंत नर, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.


यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये ३७ तर मुंबई उपनगरामध्ये ६०४ उद्याने व मनोरंजन उद्याने आहेत. या उद्यानांमध्ये स्वच्छता आणि परिरक्षण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटामध्ये उद्यानाची दैनंदिन साफसफाई, कचरा उचलणे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाचे काम तथा जबाबदारी पार पाडण्यासाठी राखणदार नियुक्त करणे यांचा समावेश आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्यास मेस्कोच्या माध्यमातून अधिक सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील.


या उद्यानांमध्ये गदुर्ल्यांचा वावर रोखण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस यांची संयुक्त मोहीम राबविली जाईल. त्यांच्यामार्फत उद्यानांमध्ये अचानक भेट आयोजित केली जाईल. चांदिवली, मानखुर्द या विभागांसह संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिवेशनानंतर बैठक घेऊन यासंदर्भात ठोस कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; महाराष्ट्र शासनाच्या नियमांत महत्त्वाचा बदल

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शासन

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा