सिंधुदुर्गच्या चारही नगराध्यक्ष पदांवर राणे कुटुंबाचे वर्चस्व कायम, उबाठा भुईसपाट

संतोष राऊळ


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांचे वर्चस्व सिद्ध झाले. सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण आणि कणकवली अशा चारही ठिकाणी राणे यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडून आल्या. यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी येथील भाजपची नगराध्यक्ष पदाची उमेदवार श्रद्धा राजे भोसले, वेंगुर्ले नगरपंचायतीवर भाजपचे दिलीप गिरप निवडून आलेत तर मालवण नगरपरिषदेवर आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ममता वराडकर निवडून आल्या आहेत. तसेच कणकवली येथे शिवसेना पुरस्कृत असलेल्या शहर विकास आघाडीत संदेश पारकर निवडून आले. कणकवली येथे आमदार निलेश राणे हे निरीक्षक होते आणि त्यांनी निवडणुकीचे निरीक्षक म्हणून दिलेल्या विजयाच्या टिप्स संदेश पारकर यांच्या विजयासाठी मोलाच्या ठरल्या. एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चारही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राणे कुटुंब यांचे नेतृत्व सिंधुदुर्गातील जनतेने स्वीकारले असेच म्हणता येईल. दरम्यान चारही शहरांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी लढाई पाहायला मिळाली आणि या लढाईत मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खूपच मागे फेकली गेली. खरं पाहता या लढाईत उबाठा कुठे स्पर्धेतच दिसली नाही. त्याचप्रमाणे ती मतांमध्ये सुद्धा फारसे अस्तित्व दाखवू शकली नाही. प्रत्येक नगरपंचायतीच्या ठिकाणी त्यांचा उमेदवार तिसऱ्या आणि चौथ्या नंबर वर फेकला गेला हे सुद्धा त्यांच्यासाठी चिंतनिय आहे.


सिंधुदुर्गातील प्रत्येक निवडणुक ही अटीतटीचीच असते. काही प्रमाणात सोपी वाटणारी निवडणूक टप्प्याटप्प्याने अवघड होत जाते आणि याचे उदाहरण सावंतवाडी, कणकवली, मालवण या ठिकाणी पहावयास मिळाले. जसे की सावंतवाडीत शिंदे सेनेला सुरुवातीला सोपी असलेली ही निवडणूक सावंतवाडीच्या राजघराण्याची सून असलेल्या श्रद्धाराजे भोसले यांच्या उमेदवारीने टप्प्याटप्प्याने जड होत गेली. माजी मंत्री आणि आमदार असलेल्या दीपक केसरकर यांचा उमेदवार अॅड.नीता सावंत कविटकर यांचा पराभव झाला. श्रद्धा राजे यांनी ५७८८ मते मिळवून विजय मिळवला. कविटकर यांना ४४२५ तर, उबाठाच्या सीमा मटकर यांना २१८४ आणि काँग्रेसच्या साक्षी वंजारे यांना ५७६ मते मिळाली.
वेंगुर्ला मध्ये भाजपचे दिलीप गिरप हे २५४९ मते मिळवून विजयी झाले. शिंदे सेनेचे नागेश गावडे २११९ मते मिळवू शकले. तर काँग्रेसचे विलास गावडे १८५४ आणि उबाठा चे संदेश निकम यांना ८३९ एवढीच मते मिळाली. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे आणि या ठिकाणी पहिल्या दिवसापासून अपप्रवृत्तीच्या विरोधात आमदार निलेश राणे संघर्ष करत असल्याचे दिसून आले. या संघर्षातूनच त्यांनी फार मोठा विजय प्राप्त केला. शिवसेनेच्या उमेदवार ममता वराडकर यांना ४२०१ मते मिळालीत, भाजपच्या शिल्पा खोत यांना ३१५४ मते मिळालीत. तर उबाठाच्या पूजा करलकर यांना ३१७९ मते मिळाली.


कणकवलीत शेवटपर्यंत अटीतटीची निवडणूक झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर झाली दुसऱ्या फेरीत भाजपचे समीर नलावडे यांनी २५५ मतांची लीड घेतली. मात्र तिसऱ्या फेरीत आणि शेवटच्या दोन प्रभागांमध्ये संदेश पारकर यांनी लीड घेत १४५ मतांनी विजय मिळविला. समीर नलावडे यांना ५०९६ तर संदेश पारकर यांना ५२४१ मते मिळाली. एकंदरीतच चारही नगरपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे पालकमंत्री नितेश राणे तर शिवसेनेचे ( शिंदे सेना ) नेतृत्व करणारे आमदार निलेश राणे यांचेच उमेदवार निवडून आलेत. यातूनच सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे कुटुंबालाच येथील जनता कौल देते हे सिद्ध झाले.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण