मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेंशियल इन्शुरन्स कंपनी (ICICI Prudential Life Insurance Company) आपला नवा आयसीआयसीआय प्रु सेक्टर इंडेक्स फंड बाजारात आणला आहे. याची खासियत म्हणजे हा फंड आयसीआयसीआय युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन (Unit Linked Insurance Plan ULIP) सुसंगत असल्याचे लाँच दरम्यान आयसीआयसीआयने म्हटले. याचा सर्वाधिक फायदा म्हणजे आता गुंतवणूकदार एकाच वेळी विमा व गुंतवणूक करु शकणार आहेत. त्यामुळे यामध्ये आपल्या गरजेनुसार गुंतवणूकदार आपली गुंतवणूकीची किंमत निश्चित करू शकतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, किमान १००० रूपयांची गुंतवणूक असेट मॅनेजमेंट कंपनीने निश्चित केली आहे. या विमा लिंक असलेल्या गुंतवणूक फंडातील (एनएफओ) गुंतवणूक ९५ ते १००% इक्विटी मालमत्तेत म्हणजेच सेन्सेक्सवरील निर्देशांकातील कंपन्यात केली जाणार आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित ५% फंड बाजारातील डेट व मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवला जाईल. ज्यामुळे फंड मॅनेजरला या ५% निधीतून तरलता (Liquidity), व निश्चित परतावा निर्माण करण्यात मदत मिळणार आहे.
माहितीनुसार हा पॅसिव्ह फंड असून विविध २० प्रकारच्या उद्योगक्षेत्रातील कंपन्यात हा निधी गुंतवला जाणार आहे. तसेच माहितीनुसार, मिळालेल्या कंपन्यांच्या लाभांशातून (Dividend) मधून ती रक्कम पुन्हा पोर्टफोलिओत गुंतवली जाणार आहे. विशिष्ट शेअर विकत घेण्यापेक्षा इंडेक्समधील विविध कंपन्यात ही गुंतवणूक केली जाईल. एकत्रित फायदा घेण्यासाठी हा फंड दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी अधिक प्रमाणात लाभदायक ठरणार आहे.
या लाँचबद्दल भाष्य करताना, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मनीष कुमार म्हणाले की, 'या फंडाचा उद्देश गुंतवणूकदारांना क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भारताच्या दीर्घकालीन वाढीमध्ये सहभागी होण्याचा एक सुव्यवस्थित आणि वैविध्यपूर्ण मार्ग उपलब्ध करून देणे आहे. विशेषतः बाजारातील अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकीत शिस्त आणि सातत्य प्रदान करण्यासाठी निर्देशांकावर आधारित दृष्टिकोन तयार करण्यात आला आहे.'
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफने सांगितले की, हा नवीन फंड त्यांच्या अनेक युलिप योजनांमध्ये उपलब्ध आहे,ज्यात आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर ॲश्युर, स्मार्टकिड ॲश्युर आणि आयसीआयसीआय प्रू स्मार्ट इन्शुरन्स प्लॅन प्लस (SIP+) यांचा समावेश आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीला आयसीआयसीआय बँक लिमिटेड आणि प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्ज लिमिटेड यांची एकत्रित कंपनी आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, कंपनीने ३.२१ लाख कोटींची व्यवस्थापनाखालील मालमत्ता असून ४२.१६ लाख कोटींची एकूण लागू असलेली विमा रक्कम नोंदवली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज सकाळी १ वाजेपर्यंत ०.७१% घसरण झाल्याने शेअर ६४५.७० रूपयांवर व्यवहार करत आहे.