Iran Israel War : "सॉरी, आम्ही यापुढे हल्ला करणार नाही"; इराणच्या पंतप्रधानांनी मागितली माफी

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान शेजारी देशांवर झालेल्या हल्ल्यांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, इराणवर प्रथम हल्ला झाला नाही तर पुढे कोणत्याही देशावर हल्ला केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


इराणच्या सरकारी टीव्हीवर प्रसारित झालेल्या भाषणात पेझेशकियन म्हणाले की, “माझ्या वतीने आणि इराणच्या वतीने शेजारी देशांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल मी माफी मागतो. अंतरिम नेतृत्व परिषदेत निर्णय घेण्यात आला की, पुढे शेजारी देशांवर हल्ले केले जाणार नाहीत आणि त्या देशांकडून इराणवर हल्ला झाला तरच प्रत्युत्तर दिले जाईल.”



इराण कधीही माघार घेणार नाही :


मात्र त्यांनी इराण कधीही माघार घेणार नाही, असे ठामपणे सांगितले. “इराणी जनतेने शरणागती पत्करावी अशी शत्रूंची इच्छा आहे, पण ती इच्छा त्यांना त्यांच्या कबरीतच घेऊन जावी लागेल,” असे त्यांनी सांगितले.



‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत युद्धाला सुरुवात :


दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर समन्वित हवाई हल्ले केले होते. अणु चर्चेतील अडथळे आणि इराणने पुन्हा अणु कार्यक्रम सुरू केल्याच्या आरोपांनंतर ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये राजधानी तेहरानसह अनेक शहरांना लक्ष्य करण्यात आले होते.
या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी, त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि नात यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.



युद्धाचे पडसाद :


यानंतर इराणने इस्रायल आणि अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. विशेषतः दुबई, अबूधाबी, कतार, कुवेत आणि बहरीन या आखाती देशांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले होते.
तसेच दुबईतील पाम जुमेराह परिसर आणि बर्ज अल अरब लक्झरी हॉटेलजवळही हल्ले झाल्याची माहिती आहे. ड्रोनचे अवशेष पडल्यामुळे दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात आग लागल्याची घटनाही घडली. बहरीनमध्ये सरकारी तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त आहे.


कतारच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशावर १४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि चार ड्रोन डागण्यात आले, त्यापैकी एक क्षेपणास्त्र अल-उदीद कतारी लष्करी तळावर आदळले.



सौदी अरेबियाचा इराणला इशारा :


दरम्यान, सौदी अरेबियाने इराणला इशारा दिला आहे. संरक्षणमंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी इराणने चुकीचा अंदाज लावू नये, असे सांगत अनेक क्षेपणास्त्र हल्ले आणि ड्रोन हल्ले परतवून लावल्याचा दावा केला आहे.


जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने या आठवड्यात पूर्वेकडील रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर दोन ड्रोन हल्ल्यांची नोंद केल्याचेही सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

School Shooting News : १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत केला अंधाधुंद गोळीबार; आधी आजी-आजोबांची हत्या; मग शाळेत घुसून...

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमधून एका अत्यंत भयानक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेची बातमी समोर आली आहे.

Cesar Gastelum : मेक्सिकोत प्रसिद्ध टिकटॉक इन्फ्लुएन्सर सीझर गॅस्टेलम यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या; जगभरात खळबळ

मेक्सिको : सोशल मीडियाच्या आभासी जगात आपल्या अनोख्या विनोदी शैलीने लाखो प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा एक

Donald Trump : थोडक्यात बचावले...! ट्रम्प यांच्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळला; प्रवासी विमान अगदी जवळ आल्याने खळबळ

Donald Trump  : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रवास करत असलेल्या 'मरीन वन' हेलिकॉप्टरशी संबंधित गंभीर घटना समोर

Bangladesh : शेख हसीनांच्या कार्यक्रमानंतर शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; बांगलादेशात तणाव

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या वडिलोपार्जित घरावर पेट्रोल बॉम्बने

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Pakistan : पाकिस्तानने सीमेवर तैनात केल्या चिनी तोफा, भारत सावध; राष्ट्रहितासाठी योग्य ती कारवाई करू, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली माहिती

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताशी खेटून असलेल्या सीमेवर चिनी तोफा तैनात करण्यास सुरुवात केली आहे. काही