Iran Israel War : अमेरिकेची इराणला धमकी; अमेरिका करणार आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही या हल्ल्यांना चोख उत्तर देत आहे. अशातच आता अमेरिकेने पुन्हा एकदा इराणला मोठी धमकी दिली आहे. अमेरिकेने आता इराणविरुद्ध सैन्य कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.


आज रात्री म्हणजेच शनिवार ७ मार्च रोजी इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार अशी धमकीच अमेरिकेचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी दिली आहे.



काय म्हणाले अमेरिकेचे ट्रेजरी सचिव ?


एका कार्यक्रमात स्कॉट बेसेंट म्हणाले की, जसे सेक्रेटरी हेगसेथ, जनरल केन आणि राष्ट्रपतींनी म्हटल्याप्रमाणे आज रात्री आमची सर्वात मोठी बॉम्बहल्ला मोहीम असेल आणि आम्ही इराणी क्षेपणास्त्र लॉन्चर आणि क्षेपणास्त्र उत्पादक कारखान्यांना सर्वात जास्त नुकसान पोहोचवू. अमेरिकन सैन्य इराणच्या क्षमतांमध्ये लक्षणीय घट करत आहे. इराण दोन मोर्चांवर लढत आहे आणि तिथे अमेरिकेची मोहीम खूप प्रभावी ठरली आहे. आम्ही खूप प्रमाणात इराणला कमकुवत केले आहे. आमची मोहीम जबरदस्त सुरू आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



इराणच्या सर्वोच्च नेत्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ...


इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांच्या हातात इराणची सूत्रे गेली आहे. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्षेप घेतला. इराणचा नेता लोकशाहीवादी असावा हे गरजेचे नाही, कुठल्याही धार्मिक नेत्याच्या हाती सत्ता राहिली तरी त्याबाबत हरकत नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराणमध्ये निष्पक्ष आणि न्यायपूर्ण वागेल असा नेता महत्त्वाचा आहे. तो व्यक्ती कोण यावर निर्भर करते. मला धार्मिक नेत्यांची समस्या नाही. मी अनेक धार्मिक नेत्यांसोबत काम करतो. जो चांगले काम करेल आणि अमेरिका इस्रायलसोबत चांगले संबंध ठेवेल असा नेता हवा असंही ट्रम्प यांनी म्हटलं.

Comments
Add Comment

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Nepal tibet border flood : नेपाळ-तिबेट सीमेवर निसर्गाचा कोप : भीषण महापुरात ८ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारमध्येही सतर्कतेचा इशारा

काठमांडू : नेपाळच्या उत्तर भागातील रसुवा जिल्ह्यात आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात बुधवारी भल्या पहाटे

Nepal flood news : नेपाळमध्ये ढगफुटीसदृश भीषण पूर! अनेक गावांसह हजारो नागरिक वाहून गेल्याची भीती; पॉवर प्रोजेक्ट्स, रस्ते आणि पुलांचे मोठे नुकसान

काठमांडू : हिमालयीन देश असलेल्या नेपाळमध्ये निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. तिबेटच्या सीमेला लागून

Islamabad Hospital Fire : इस्लामाबाद रुग्णालयात गायनेकोलॉजी वॉर्डला भीषण आग; अवघ्या एका बाळाला वाचवण्यात यश, १५ चिमुकल्यांचा होरपळून अंत

इस्लामाबाद : वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या आणि संवेदनशील मनांना चटका लावून जाणाऱ्या दोन अत्यंत

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,