खोपोलीत शिवसेना शिंदे गटाचे कुलदीपक शेंडे

खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप, आरपीआय महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली. अटीतटीच्या लढाईत कुलदीपक शेंडे (एकूण मते २०४६९ मते) तर सुनील पाटील यांना १९३५१ मते मिळाली असून फक्त १११८ मतांनी निसटता पराभव झाला. एकूण १५ प्रभागात शिंदे गट १४, अजित पवार राष्ट्रवादी ७, अपक्ष १, भाजप ४, शेकापक्ष ४, शरद पवार - १ असे उमेदवार निवडून आले. अजित पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, माजी नगरसेवक किशोर पानसरे, शिंदे गटाचे माजी नगरसेविका माधवी रिठे, माजी उपगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युअल यांचा मुलगा बेबी सॅमुअल आणि सुनबाई माजी नगरसेविका जिनी सॅमुअल, भाजपचे माजी नगरसेवक इंदरमल खंडेलवाल, शेकापचे माजी नगरसेवक अरुण पुरी, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव यांचे चिरंजीव यश जाधव, माजी नगरसेवक दिलीप जाधव, माजी नगरसेवक राजू डूमने, माजी नगरसेविका मेघा वाडकर, माजी नगरसेवक संतोष मालकर, माजी नगरसेविका शिल्पा मालकर पतीपत्नी तसेच माजी नगरसेविका प्रमिला सुर्वे यांचा पराभव झाल्याने मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

रोहा नगर परिषदेवर पुन्हा राष्ट्रवादी

रोहा : स्वराज्य स्थानिक निवडणुकीमध्ये २ डिसेंबर रोजी रोहा नगर परिषदेच्या हद्दीत मतदान घेण्यात आले. त्याची

महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा

नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील कविस्कर महाड : रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित, खा. सुनील तटकरे व भरत गोगावले

ओंबळी येथे आपत्ती निवारा शेड उभारणार

पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी गावात आपत्ती निवारा शेडच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ मंत्री भरतशेठ गोगावले

शेकाप नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

माणगाव : माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे शेकापचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती अस्लम राऊत यांच्यासह

श्रीवर्धनमध्ये मंत्री अदिती तटकरे यांना पराभवाचा धक्का

श्रीवर्धन : श्रीवर्धन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले यांनी २१९

शिवसेना-भाजप युतीची एकहाती सत्ता

चंद्रकांत चौधरी नगराध्यक्ष पदावर विजयी माथेरान : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या माथेरान नगर परिषद